आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी आभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांचे थाळ्यानाद आंदोलन:कृषी सेवा परीक्षेतील बदलाचा निषेध, तेराव्या दिवशी उपोषण सुरूच

अहमदनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कृषी सेवा परीक्षेतील केलेल्या बदलांमुळे कृषी अभियंत्याच्या ताटातील घास काढून घेतल्याचा आरोप करत महात्मा फुले कृषी विद्यापीठातील आभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी (6 फेब्रुवारी) आंदोलनाच्या तेराव्या दिवशी रिकाम्या थाळ्या वाजवून आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी केली.

लोकसेवा आयोगाने कृषी आभियांत्रिकी शाखेतील विषय हा कृषी महाविद्यालय अभ्यासक्रमातील घेतलेला आहे. दरम्यान, पदवी स्वतंत्र असल्याने कृषी स्पर्धा परीक्षेमध्ये कृषी आभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रमात समावेश करावा, अशी मागणी या शाखेतील विद्यार्थ्यांकडून झाल्याने लोकसेवा आयोग विरुद्ध आभियांत्रिकी विद्यार्थी या वादाला तोंड फुटले आहे.

आपल्या मागणीसाठी राहुरी कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर आभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. सोमवारी आंदोलनाचा तेरावा दिवस असताना अद्याप कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही. आंदोलन दरम्यान काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली आहे. सोमवारी लोकसेवा आयोग व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी थाळीनाद करून कृषी विद्यापीठाचा परिसर दुमदुमून टाकला.

आभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी म्हटले आहे की, लोकसेवा आयोगाकडून आमच्या ताटातील घास हिरावून घेतला, अशी एक भावना आमच्या मनात निर्माण झाली. म्हणूनच या मोकळ्या ताटांनी आम्ही थाळी नाद आंदोलन करत आहोत. लोकसेवा आयोग व शासनाने लवकरात लवकर कृषी अभियंत्यांची दखल घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. कृषी पदवी अभ्यासक्रमात कृषी व्यवस्थापन, व्यवसाय व्यवस्थापन, कृषी उद्यानविद्या, फिशरी, फाॅरेस्ट्री, व्हेटरनरी, जैव तंत्रज्ञान पदवीचा समावेश आहे. भविष्यात या अभ्यासक्रमाची पदवी स्वतंत्र असल्याने कृषी स्पर्धा परीक्षेत या अभ्यासक्रमाचा देखील समावेश करावा, अशी मागणी पुढे येण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...