आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवडते क्षेत्र:विद्यार्थ्यांनी आवडत्या क्षेत्रात भविष्य घडवावे ; परीक्षेला जीवनात विशेष महत्त्व

राहुरी19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परीक्षा या भविष्यात येणाऱ्या आव्हानांची तयारी करून घेतात. त्यामुळे परीक्षेला जीवनात विशेष महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात भविष्य घडवावे, असे प्रतिपादन राहुरी तालुक्यातील ज्येष्ठ नेते अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी केले. बारावीच्या परीक्षेत वांबोरी पंचक्रोशीतील कन्या माध्यमिक विद्यालय वांबोरी ,महेश मुनोत माध्यमिक विद्यालय वांबोरी, तालुका व जिल्हा शाळांमधील यश संपादन करणाऱ्या विद्यार्थिनींचा ज्येष्ठ नेते अ‍ॅड. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ॲड. पाटील म्हणाले, यशस्वी वाटचालीतून समाज व देशाचे भविष्य उज्ज्वल करण्याची संधी विद्यार्थिंनींना मिळणार आहे. या कार्यक्रमाला वांबोरीचे सरपंच किरण ससाणे, हेमंत मुथ्था, नारायण हुलुळे, मुख्याध्यापक भाऊसाहेब तागड, मुख्याध्यापक पडोळे, वनाजी राऊत, सारंगधर पठारे, परिषद व्यास, भरत भांंबळ, विलास गुंजाळ, संजय नागदे, पोपटराव पटारे, चंद्रकांत राऊत, दत्तात्रय जवरे, रविंद्र रहाणे, बाळासाहेब तोडमल, भाऊसाहेब पटेकर, ललित चौधरी, प्रा. पालवे, भाऊसाहेब ढोकणे, सत्यनारायण मांडण, अंकुश मकासरे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...