आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविज्ञानाला शिस्त असते म्हणून विज्ञानाची प्रगती होते. निसर्गाने आपल्याला खूप काही दिले आहे.त्यामुळे निसर्गाशी मैत्री करा.तसेच आई वडील,शिक्षक यांचे आदर्श समोर ठेऊन प्रगती करावी.तसेच मनातील न्यूनगंड,भयगंड व अहंगंड काढून टाकले पाहिजे, असे प्रतिपादन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले.ते बेलापूर येथे श्रीरामपुर पंचायत समिती शिक्षण विभाग, श्रीरामपुर तालुका विज्ञान गणित अध्यापक संघटना तसेच जेटीएस विद्यासंकुल यांचे संयुक्त विद्यमाने ५० वे श्रीरामपूर तालुका गणित विज्ञान प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी बोलत होते.अध्यक्षस्थानी सचिव अॅड. शरद सोमाणी होते.
यावेळी गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, विश्वस्त बापूसाहेब पुजारी, राजेश खटोड, हरिचंद्र महाडिक, शेखर डावरे, प्राचार्य श्रीराम कुंभार, उपप्राचार्या सुनीता ग्रोव्हर,सूर्यकांत डावखर, अनिल ओहोळ, इरफान शेख, गणित विज्ञान संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रकटे, विजय नान्नर, सचिव वासुदेव गायके, मनीषा थोरात, आदिक आदी पस्थित होते.
तहसीलदार पाटील म्हणाले, विज्ञान जीवनाशी निगडित असते ते शिक्षकांनी मुलांना समजाऊन सांगावे,आपले सर्व जीवन विज्ञानाशी निगडित आहे.तर गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी म्हणाल्या न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षण शोध लावल्यानंतर त्यांना जागतिक दर्जाच्या रजिस्टर मध्ये स्वाक्षरी करण्याचे भाग्य मिळाले.त्याच रजिस्टर मध्ये त्यानंतर स्वाक्षरी करण्याचा मान भारतीय शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांना मिळाला.यावेळी अॅड. शरद सोमाणी,चेअरमन बापूसाहेब पुजारी, अनिल ओहोळ यांचीही भाषणे झाली. प्रास्तविक विनय नान्नर यांनी, तर तर आभार साहेबराव रकटे यांनी मानले.
काही लोक ऍसिडीक असतात
आपल्या संपर्कात येणारे काही लोक ऍसिडीक असतात तर काही अल्कली असतात.प्रत्येकाला समजून घेता आले पाहिजे.तर झाले तर आपोआप आपल्याला पीएच मेंटेन करता येतो.त्यामुळे विद्यार्थ्यांनी जीवनात बोन्साय बनून राहण्यापेक्षा झाडासारखे विशाल कर्तृत्व करावे असेही तहसीलदार पाटील म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.