आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना महामारी:विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत धेय्यवादी बनावे : सानप

कोपरगाव5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना महामारीमुळे शिक्षण क्षेत्रात झालेले बदल तसेच समाज माध्यमांचा वाढता प्रभाव यामुळे विद्यार्थी अभ्यासू वृत्ती, प्रयत्नशीलता आणि धेय्यवाद यापासून काहीसा दुरावत चालला आहे. सकारात्मक विचार दृष्टीतून विद्यार्थ्यांनी या परिस्थितीवर मात करावी आणि आपल्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत धेय्यवादी बनावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. रमेश सानप यांनी केले.

येथील श्रीसद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस् अँड संजीवनी कॉमर्स कॉलेजमध्ये ११ वी सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाप्रसंगी ते बोलत होते. महाविद्यालयातील अनुभवी व जिज्ञासू शिक्षकांच्या अनुभवाचा फायदा घेत स्वतःचे करिअर विद्यार्थ्यांनी घडवावे. यावेळी सर्व नवीन प्रवेशितांचे बॉलपेन भेट देऊन स्वागत करण्यात आले. उपप्राचार्य प्रा. रामभाऊ गमे, पालक प्रतिनिधी प्रशांत आढाव यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व स्वागत विज्ञान विभाग प्रमुख प्रा. के. एस. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. हिंगे यांनी केले. गणित विभाग प्रमुख प्रा. व्ही. एस. मोरे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...