आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याख्यान:स्वप्ने साकार होण्यासाठी विद्यार्थी दशेत मेहनत घ्यावी; युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांचे आवाहन

अकोलेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात घराघरांतून फार मोठा उठाव झाल्यानंतर १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. या चळवळीत योगदान देतानाच आदिवासी भागांतून गुरूवर्य बा. ह. नाईकवाडी यांनी अगस्ति एज्युकेशन सोसायटीची १९६६ मधे स्थापना करून बहुजन समाजासाठी ज्ञानाची कवाडे उघडी करून दिली. यातूनच अकोले तालुक्यात चांगले डॉक्टर, इंजिनिअर, वकील, न्यायाधीश, शिक्षक निर्माण होत आहेत व सर्व क्षेत्रातून नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून योगदान देत आहेत. शालेय जीवनात अत्यावश्यक संस्कार व आवश्यक शिक्षण पूर्ण करून आपल्या आवडत्या क्षेत्रांतून तसेच एमपीएससी व एमपीएससीतून सनदी अधिकारी होऊन देश विकासात योगदान द्यावे. याबाबत आपली स्वप्ने साकार होतील यासाठी जरूर मेहनत घ्यावीच लागेल, असे आवाहन युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले.

अकोल्यातील अगस्ति मंगल कार्यालयात स्व. गंगाधर नाईकवाडी काका यांच्या स्मरणार्थ विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी तांबे बोलत होते. अध्यक्षस्थानी अगस्ति एज्युकेशन संस्थेचे कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी होते. व्याख्यानाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती, अगस्ति एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक स्वातंत्र्यसेनानी गुरुवर्य बा. ह. नाईकवाडी बाबा व माजी अध्यक्ष स्व. गंगाधर नाईकवाडी काका यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करण्यात आले.

तांबे म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळातील फक्त १७ संख्या असलेल्या विद्यापीठांवरून स्वातंत्र्योत्तर काळात त्या संख्येत वाढ होऊन ती १२०० झाली. आजमितीस सरकारी व खासगी मिळून १७०० विद्यापीठ देशात आहेत. यातूनच विविध स्पर्धा परीक्षेतून विद्यार्थी उत्तीर्ण होऊन जनसेवक होऊन प्रशासनास सहकार्य करीत आहेत. बहुतांश विद्यालयातून दहावीत ८० टक्के टाॅपर मुलीच आलेल्या पहायला मिळतात. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त योगदानातून आज मुलींना शिक्षण मिळत आहे. भारतीय संविधान व घटना लिहिल्यानंतर लगेचच देशातील महिलांसह सर्वांनाच शिक्षणासह राजकारणात सहभाग मिळाला. मात्र अतिशय प्रगत देश असलेल्या अमेरिकेत हे अधिकार स्वातंत्र्यानंतर तब्बल १०० वर्षानंतर मिळालेत. यामुळेच याबाबत आपण भाग्यवान आहोत, असे तांबे म्हणाले. प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजी धुमाळ यांनी केले. सुत्रसंचलन सतिश पाचपुते यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...