आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचास येथील श्री नृसिंह विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले. यानिमित्त अायाेजित कार्यक्रमात ५ वी ते १० वीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवले. यात दारूबंदी, सामाजिक समस्यावर आधारित भारुड, गवळण, भजन, जागर, गोंधळ सादर करण्यात आले.
लोकगीते व काही चित्रपट गीतांवर नृत्य सादर केले. विविध देशभक्तीपर गीतेदेखील सादर करण्यात आली. बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त मुकेश मुळे हे होते. तर व्यासपाठीवर चासचे सरपंच राजेंद्र गावखरे, उपसरपंच युवराज कार्ले, राधाकृष्ण वाळुंज, युवराज गायकवाड उपस्थित होते. मुकेश मुळे यांनी वर्षभराच्या कार्यक्रमांचा व स्पर्धांचा आढावा घेतला आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
प्रास्ताविक मुख्याध्यापिका घोडके यांनी केले. या प्रसंगी रावसाहेब भोर, अनिल गवळी, उत्तम कार्ले, सुभाष गोंडाळ, मारुती देवकर, अरूण गोंडाळ, दीपक कार्ले, मारुती गुंजाळ,शिवाजी कार्ले,गणपत काळे, किसन वाळुंज, गिताराम काळे, अर्चना कार्ले, जयश्री गोंडाळ, दीपाली देवकर व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचलन स्वाती अहिरे, आशंका मुळे यांनी, तर आभार आशा आरडे यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.