आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामढी येथील शिवतेज विद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. शेतकऱ्यांची समस्या, समाजात घडणाऱ्या प्रसंगाचे नाटक, देशभक्तीपर गीत, वासुदेव आला रे वासुदेव आला यांसारख्या अनेक गाण्यांवर नृत्याविष्कार सादर करत विद्यार्थ्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. कार्यक्रमाच्या प्रारंभापासून सादर होणाऱ्या विविध संस्कृतीवर आधारित नृत्याविष्कार अन् विद्यार्थ्यांच्या कलागुणांतून दर्शवण्यात आलेली राष्ट्रीय एकात्मता, असे जल्लोषमय वातावरण शिवतेज विद्यालयाचे स्नेहसंमेलनात बघायला मिळाले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ. धनंजय मुखेकर, सचिव वंदना मुखेकर, मढी देवस्थानचे अध्यक्ष बबन मरकड, सरपंच संजय मरकड ,माजी सरपंच भगवान मरकड, युवा नेते कुशल भापसे, निवडूंगे सरपंच वैभव देशमुख, शाळेचे समन्वयक बाळासाहेब मरकड, देवस्थानचे कोषाध्यक्ष भाऊसाहेब मरकड, माजी संचालक नवनाथ मरकड, उपसरपंच रवींद्र आरोळे, सेवा सोसायटीचे अध्यक्ष विष्णू मरकड, उपाध्यक्ष शंकर पाखरे, प्राचार्य गौतम ढेकणे, ग्रामस्थ एकनाथ मरकड, सुधीर मरकड, हरिचंद्र मरकड, प्रदीप पाखरे आदी उपस्थित होते.
स्नेहसंमेलनाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी विविध संस्कृतीवर आधारित वेशभूषा करत, देश रंगीला या गाण्यावर नृत्याविष्कार सादर केला. यावेळी विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणाने परिसर दुमदुमला. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित पोवाडा सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. वासुदेव आला ,संदेसे आते है ,मला आमदार झाल्या सारख वाटतयं, वेड यांसारख्या अनेक गाण्यांवर नृत्याविष्कार सादर करत विद्यार्थ्यांनी रसिकांची मने जिंकली. प्रास्ताविक बाळासाहेब मरकड यांनी, सूत्रसंचालन दशरथ मरकड यांनी, तर आभार गणेश मरकड यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.