आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचा विरोध:राहुरी कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचा ठिय्या

राहुरी7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमात बदल केल्याने कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे अभ्यासक्रम पूर्ववत ठेवावा. या मागणीसाठी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात परिक्षार्थींनी ठिय्या आंदोलन केले.

लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे विद्यार्थी संघटनेने स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात येणार नसल्याचे संकेत स्थळावर २१ जून २०२१ रोजी स्पष्ट सांगितले होते. प्रत्यक्षात फेब्रुवारी महिन्यात असा बदल करण्यात आला असून कृषीसाठी २८० गुणांऐवजी फक्त सोळा गुणांचाच नवीन अभ्यासक्रमाचा समावेश असणार आहे. कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये त्यामुळे तीव्र असंतोष असून याबाबत अनेकांनी संबंधितांना सातत्याने निवेदने पाठवली. परंतु त्यांची काहीही दखल घेतली गेली नाही. म्हणून संघटनेने राज्य स्तरावर आंदोलन सुरू केले.

कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील यांनी सोमवारी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. विद्यार्थ्यांनी संघटनांच्या मागणीनुसार राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या ऑनलाइन बैठकीत या मागण्यांबाबत विचार केला आहे. त्याबाबतचा अहवाल ते सर्व संबंधितांना राज्य शासन, लोकसेवा आयोग व राज्यपालांकडे पाठवेणार असल्याचे विद्यार्थी संघटनेने सांगितले. मात्र लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे विद्यार्थी संघटनांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...