आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला सबलीकरण:महिलांचा अभ्यास दौरा कृषी क्षेत्रासाठी लाभदासक ठरेल

शिर्डी16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या महिला सन्मान वर्षातच कृषि विभागाच्या वतीने आयोजित केलेला महिलांचा दापोली कृषि विद्यापीठ, तळेगांव दाभाडे या ठिकाणचा अभ्यास दौरा कृषी क्षेत्रासाठी लाभदायक ठरेल, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे यांनी व्यक्त केला.कृषि विभाग, जनसेवा फौंडेशन आणि सिंधूताई महिला प्रोड्युसर कंपनी अंतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान मनुष्यबळ विकास कार्यक्रमातंर्गत प्रक्षेत्र भेट कार्यक्रमा निमित्त महिला शेतकऱ्यांसाठी पाच दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्याचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष विखे, खासदार डॉ. सुजय विखे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी संगमनेरचे उपविभागीय कृषि अधिकारी सुधाकर बोराळे, राहाता तालुका कृषि अधिकारी बापूसाहेब शिंदे, संगमनेरचे तालुका कृषि अधिकारी प्रविण गोसावी,प्रकल्प संचालिका रुपाली लोंढे आदींसह सहभागी महिला उपस्थित होत्या.

शेतकरी महिला शेतात काम करतांना अनेक समस्यांना तोंड देत असते. हा दौरा त्यांच्या ज्ञानात भर टाकणारा ठरले, असे विखे म्हणाल्या. नवे तंत्रज्ञान विकसित करावे पाच दिवसीय या दौऱ्यातून महीलांनी प्रक्रिया उद्योग, फळबाग फुलशेती, हंगामी पिके, पुरक व्यवसाय बघता येणार अस्लायानेम याचा लाभ येणाऱ्या काळात आपल्यासाठी आणि इतरांसाठी होईल, असेही त्यांनी सांगितले.

या दौऱ्यात महिला कांदा लसूण, संशोधन केंद्र, राजगुरुनगर, द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी, वसंतदादा शुगर इंस्टीट्युट, मांजरी, फुड पार्क कात्रज, सेंद्रीय शेती उत्पादक गट, भोर, सारे पाटील, पॉलीहाऊस प्रक्षेत्र, मसाले पिक संशोधन केंद्र. दापोली कृषि विद्यापीठ, तळेगाव दाभाडे आदी ठिकाणी भेटी देणार आहेत. यामध्ये संगमनेर, अकोले, राहाता आणि कोपरगाव येथील ६० महिला सहभागी झाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...