आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सह्याद्री फार्म:अभिनव शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांची सह्याद्री फार्म्सला अभ्यास भेट

अकोले12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनव शिक्षण संस्थेतील एमबीए महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मोहाडी (नाशिक) येथील ‘सह्याद्री फार्म्स’ या संस्थेला दिलेली अभ्यासपूर्ण भेट विद्यार्थ्यांसाठी अधिक व्यापक ठरली, अशी माहिती अभिनव शिक्षण संस्थेच्या एमबीए महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ. अनिल बेंद्रे यांनी माध्यमांना दिली.

नाशिक जिल्ह्य़ातील मोहाडी येथील ‘सह्याद्री फार्म्स’ या कृषी औद्यागिक कंपनीत अभिनव शिक्षण संस्थेतील एमबीए विद्यार्थ्यांनी अभ्यास भेट देऊन कृषी औद्योगिक विविध उत्पादित उत्पादने व उपक्रमांची माहिती घेतली. या कंपनीत शेतमालावर प्रक्रिया करून शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून ग्राहकांच्या पसंतीनुसार कृषी उत्पादने बाजारात उपलब्ध करून देतात.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरतून कृषी प्रक्रियेपासून निर्मित कृषी उत्पादने निर्यातक्षम करणाऱ्या कंपनीत प्रत्यक्ष कामकाज कसे चालते याची माहिती विद्यार्थ्यांना होण्याकरिता एमबीए महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ. अनिल बेंद्रे यांच्या मार्गदर्शनातून अभिनव शिक्षण संस्थेने एमबीए विद्यार्थ्यांचा हा अभ्यासदौरा आयोजित केला होता.यापुढील काळात अभिनव शिक्षण संस्थेच्या एमबीए विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमात अशा औद्योगिक क्षेत्रीय भेटीतून उत्तरोत्तर लाभ मिळेल त्यातून गुणवंत विद्यार्थी व पुढे उद्योजक तयार होतील, यासाठी एमबीए महाविद्यालयाचा औद्योगिक कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करण्यात येतील, असा विश्वास अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर नवले व विक्रम नवले यांनी व्यक्त केला.

या भेटीत द्राक्ष, केळी, पेरू, डाळिंब आदींसह विविध फळांवरील प्रक्रिया उद्योगातून निर्यातक्षम उत्पादने बनविण्याच्या प्रक्रियेबद्दलची माहिती घेतली.‘सह्याद्री फार्म्स’ च्या प्रतिनिधी पूजा कदम यांनी याबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी ही भेट अभ्यासपूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी प्रा. विनोद पठाडे, प्रा. शोएब शेख हेही उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...