आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर:बैलाच्या पायांना नाल बसवणाऱ्याचा मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक

सोनई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिरेगाव येथील प्रकाश बोर्डेच्या जिद्दीची कहाणी

शिरेगाव येथील प्रकाश बाळासाहेब बोर्डे यांनी घरीच अभ्यास करून पीएसआय पदाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन दाखवून दिले. प्रकाशाचे वडील बाळासाहेब बोर्डे हे गावोगावी जाऊन बैल व गाय यांचे शिंगे साळण्याचे काम करतात. तसेच ऊसतोडणी हंगामात बैलाच्या पायाला त्रास होऊ नये म्हणून नाल बसवण्याचे काम करतात, तर आई मंगल बाळासाहेब बोर्डे परिसरातील शेतकऱ्यांच्या घरी मोलमजुरी करतात. प्रकाशाला घरी एकही गुंठा शेत जमीन नाही, दोन पैसे जास्त पैसे मिळतील, असा व्यवसाय ही नाही. आशा प्रतिकूल परिस्थितीतही आई-वडिलांनी प्रकाशला कोल्हापूर व पुणे शहरात शिक्षणासाठी पाठवले. घरची परिस्थिती अडचणीची असताना देखील प्रकाशने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. या यशात आई-वडील व भाऊ-बहीण यांची प्रकाशला खूप मदत झाली. प्रकाशचे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल शिरेगाव व पदवी पर्यंतचे शिक्षण सोनईच्या महाविद्यालयात झाले आहे. पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल मंत्री शंकरराव गडाख, अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनीलराव गडाख, युवा नेते उदयन गडाख आदींनी अभिनंदन केले. मोठ्या कष्टातून काम करणाऱ्या बोर्डे दाम्पत्याचा मुलगा पीएसआय झाला, ही बाब सर्व तरुणांना निश्चितच प्रेरणादायी व अभिमानास्पद आहे. यातून तरुण निश्चितच प्रेरणा घेत सुयश संपादन करतील, असे युवा नेते उदयन गडाख यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...