आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीगोंदे तालुक्यातील आढळगाव येथील सुभेदार हनुमंत दगडू काळे, वय ४२ व त्यांचे गावातील मित्र दत्तात्रय पोपट काळे हे पुणे येथे सुभेदार काळे यांच्या सरकारी कामासाठी गेले असताना त्यांच्या दुचाकी ला डंपर ने धडक दिल्याने या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. सुभेदार हनुमंत काळे याना भारतीय सैन्य दल आणि जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. त्यांच्यावर आढळगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
आढळगाव येथील सुभेदार हनुमंत दगडू काळे हे भारतीय सैन्य दलात उत्तराखंड येथील अलमोडा येथे बावीस राजकोट बटालियनमध्ये सुभेदार म्हणून कार्यरत होते. ते त्यांच्या सैन्यदलाच्या कामानिमित्त पुणे येथे ५ ऑगस्ट रोजी जाताना त्यांनी त्यांचे मित्र दत्तात्रय पोपट काळे यांना बरोबर नेले होते. मात्र पुण्यात एक चौकात त्यांना दुपारी डंपरने धडक दिली होती.
यात दोघे ही जागीच ठार झाले होते. आज, ६ ऑगस्ट रोजी दुपारी अकरा वाजता आढळगावमध्ये दोन्ही मित्रांचे पार्थिव आणले. सुभेदार हनुमंत काळे यांची गावातून भारतीय सैन्य दलाच्या फुलांनी सजवलेल्या वाहनातून स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. सुभेदार काळे याना पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, तहसीलदार मिलिंद कुलथे, माजी आमदार राहुल जगताप, आमदार बबनराव पाचपुते व सैन्य दलाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. जिल्हा पोलिस दल आणि भारतीय सैन्य दलाच्या वतीने हवेत फायर करून मानवंदना देण्यात आली. यावेळी गावासह परिसरातील माहिला, पुरुष, नातेवाईक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. सुभेदार काळे यांच्या मागे आई, वडील, भाऊ, भावजई, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.