आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहवाल:शहरातील बुजवलेल्या ओढे व नाल्यांचा अहवाल सादर करा

नगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील भूखंड विकसित करताना नैसर्गीक ओढे नाले पाईप टाकून बुजवण्यात आले आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन अनेक घरात पाणी शिरले. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी बुजवलेल्या नाल्यांची यादी सादर करावी तसेच पूर्वीचे व आताचे ओढ्याचे स्वरूप याचा छायाचित्रांसह अहवाल सादर करण्याचे आदेश नगर रचना व बांधकाम विभागाला दिले.

शहरात मुसळधार पावसामुळे अनेक घरात पाणी शिरले होते, पूर स्थितीची पाहणी केल्यानंतर आयुक्त जावळे यांनी आपत्कालीन व्यवस्थापन व सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. प्रभागनिहाय कर्मचारी संख्या व आत्कालीन स्थितीत उपलब्ध यंत्रणा याचा आढावा घेऊन सूचना दिल्या आहेत. नगर रचना व बांधकाम विभागाने अस्तित्वात असलेले किती नाले बुजवले ? याची यादी सादर करावी. पुन्हा एकदा त्याचे सर्वेक्षण करावे. चारही प्रभाग अधिकाऱ्यांनी पाणी अडल्याची ठिकाणे, पाइप टाकून ओढा बंद केलेल्या ठिकाणांची यादी तात्काळ नगर रचना विभागाला सादर करण्याची सूचना आयुक्त जावळे यांनी दिली.

बैठकीतील ठळक मुद्दे
प्रभाग अधिकाऱ्यांनी ओढा बंद केलेल्या ठिकाणांची यादी द्यावी, वरुळाचा मारुती परिसरातील पाण्याचे पाईप उचलून घ्यावेत, स्टोअर विभाग मार्फत डिझेल वर चालणारे पंप घ्यावेत, आपत्कालीन स्थितीत स्थलांतरासाठी जवळील शाळा खोल्यांच्या चाव्या प्रभाग अधिकाऱ्यांकडे असाव्यात, नालेसफाईची संपूर्ण माहिती तात्काळ सादर करावी, दररोज एक अधिकारी यांची आपत्कालीन परिस्थितीवर देखरेखीसाठी नेमणूक असेल.

का ओढावते आपत्कालीन स्थिती
ओढे नाले बुजवल्याने पूरस्थिती उद्भवणार असल्याचे अहवाल मागील पाच ते दहा वर्षांत अनेकदा अतिक्रमण विभागाने ठेवले. त्यावर अद्याप कारवाई झाली नाही. मोजणी तसेच गावनकाशावर ओढे नसल्याने पाईप टाकून जुजबी उपाय योजना करून भुखंड विकसीत केले जात आहेत. याप्रकाराला आळा घातला जात नसल्याने अधिकारी व मानवनिर्मीत आपत्कालीन स्थिती उद्भवत आहे.

“आपत्ती’ कडे काय?
आपत्कालीन व्यस्थापन कक्षाकडे हायड्रोलीक शिडी, कर्मचाऱ्यांना फायरसुट, लाईफ जॅकेट १००, लाईफ बॉय (रिंग ) २०, रोप १०० मीटरचे प्रत्येकी २, टॉर्च ६०, आहेत, असे व्यवस्थापन प्रमुख शंकर मिसाळ यांनी सांगितले.

पाइप गायब
पत्रकार चौकाजवळील ओढ्या लगत चार जलवाहिन्यांचे पाईप वाहून गेले. नालेगाव परिसरात वरुळाचा मारुती परिसरात सीना नदी पुलावर १६ पाईप निघाले होते, त्यापैकी १२ पाईप शोधले असे जल अभियंता परिमल निकम यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...