आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश:शिष्यवृत्ती परीक्षेत अगस्ति च्या 35 विद्यार्थ्यांचे यश

अकोले5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी घेतलेल्या पुर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अकोले येथील अगस्ति विद्यालयाचे ३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परिक्षेत इयत्ता ८ वीतील साई किशोर गोर्डे हा विद्यालयातून प्रथम आला. तर इयत्ता ५ वीतील अर्णव राहुल सोनवणे व आदित्य दत्तू पोखरकर हे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून अगस्ति विद्यालयात इयत्ता ५ वी व ८ वीत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात येते. अगस्ति विद्यालयातून सोनवणे अर्णव, पोखरकर आदित्य, मंडलिक दिक्षा, नवले आरोही, दराडे प्रणिता, वैराळ आर्या, आभाळे स्वराली, चौधरी सार्थक, नवले ईश्वरी, नाईकवाडी सर्वेश, धुमाळ स्वरा, जाधव वैष्णवी, दिघे पियुष, मुठे ओंकार, चव्हाण मनस्वी, उघडे तनिष्का, चौधरी संस्कृती, यशराज कदम, श्रेया डगळे हे ५ वी इयत्तेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळविली. तर इयता ८ वीतील साई गोर्डे, आदित्य कोंडार, कृष्णा मोहिते, यशोधन हासे, ईश्वरी भोसले, कार्तिक आवारी, श्रेयस लांडे, वैष्णवी काळे, सुयश खाडगीर, तीर्था रंधे, सावनी शेळके, सायली नवले, कावेरी गोर्डे, श्रुती सोनवणे, कस्तुरी राहाटाळ, ओंकार आभाळे आदी विद्यार्थ्यांनी यश मिळवत शिष्यवृत्ती पटकावली.

अगस्ति एज्युकेशन संस्थेच्या सेक्रेटरी दुर्गाबाई नाईकवाडी, अध्यक्ष शैलजा पोखरकर, कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी, सतीश नाईकवाडी, संदीप नाईकवाडी, प्राचार्य शिवाजी धुमाळ, उपप्राचार्य सुजल गात, पर्यवेक्षक मंगेश खांबेकर, एस. बी. शिंदे यांनी या विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला. विद्यालयात सातत्याने घेतलेले सराव व शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन मार्गदर्शक ठरल्याची भावना अर्णव सोनवणे याने व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...