आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसएससी निकाल:कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे यश ; एस एस सी परीक्षाचा निकाल 95.49 टक्के

कोपरगाव शहर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रयत शिक्षण संस्थेच्या, कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाचा एस एस सी परीक्षाचा निकाल ९५.४९ टक्के लागला आहे. या परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण २२२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते, त्यापैकी २१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयात प्रथम झावरे यशराज दिपक ९३.६०%, द्वितीय झाडगे पुरुषोत्तम ९९.४०%, तृतीय महाजन अनुराग कैलास ९१.२०% या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षकवृंद यांचे शाळा समिती सदस्य बिपीन कोल्हे, आमदार आशुतोष काळे व पद्माकांत कुदळे मुख्याध्यापक सुरेश कातकडे, उपमुख्याध्यापिका राजेभोसले मॅडम, पर्यवेक्षक लव्हाटे के.डी. व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...