आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिस्तुल शुटींग:राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये रायफल अॅण्ड पिस्तुल शुटींग क्लबचे यश; 4 ते 8 मे २०२२ या कालावधीत नाशिक येथे या स्पर्धा झाल्या

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिष्मराज बाम मेमोरियल राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत नगर रायफल अॅण्ड पिस्तुल शूटिंग रेंजच्या खेळाडूंना मोठे यश मिळाले असून यामध्ये दोन सुवर्ण, दोन रौप्य, दोन कांस्यपदकाचा समावेश आहे. ४ ते ८ मे २०२२ या कालावधीत नाशिक येथे या स्पर्धा झाल्या.

शुटींग क्लबचे १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात गौरव खेडकर सिनियर गटात सुवर्णपदक, मंजू खाडे सिनियर गटात रौप्यपदक, श्रावणी भगत सब युथ गटात रौप्यपदक, राज फटांगडे याने सब युथ गटातून कांस्यपदक, रौनक टोकशिया याने आयएसएसएफ कॅटेगिरीत सिनियर गटात कांस्यपदक व १० मीटर ओपन साईट खेळ प्रकारात रोहीत वाघ याने चांगली कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.

सर्व यशस्वी खेळाडूंना अलीम शेख, ऋषिकेश दरंदले यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे जिल्हा क्रीडा आधिकारी भाग्यश्री बिले, क्रीडा आधिकारी दीपाली बोडखे, बॅडमिंटन प्रशिक्षक विशाल गर्जे, बाळासाहेब पवार यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...