आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घवघवीत यश:किक बॉक्सिंग व कराटे स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व महानगरपालिका यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय किक बॉक्सींग, कराटे स्पर्धेत श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला माध्यमिक विभागातील खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले आहे. आदिती जाधव हिने कराटे, किक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. तसेच जितेश इथापे, मनिष कराड, आकाश आव्हाड व रूदाक्ष जिंदम यांनीही सुवर्णपदके मिळवली.

या खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख पी. पी. लोंढे यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले. या खेळाडूंच्या उज्वल यशाबद्दल संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच शालेय समितीचे अध्यक्ष किशोर देशपांडे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका संगिता जोशी, पर्यवेक्षिका संगिता सोनटक्के, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...