आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाधान:मुळा, ज्ञानेश्वर कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी, शेतकऱ्यांतून समाधान

कौठा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सन २०२१-२२ चा गळीत हंगामात मुळा, ज्ञानेश्वर कारखान्यासमोर कार्यक्षेत्रातील उस गळिताचे मोठे आव्हान होते. तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठे असल्याने सर्व उसाचे गाळप करण्यासाठी कारखान्याची यंत्रणा काम करत होते. पंरतु गळीताच्या शेवटच्या टप्प्यात शिल्लक ऊस राहिल का? या भीतीपोटी शेतकरी धास्तावले होते. पण कारखाना व्यवस्थापन, अधिकारी, कर्मचारी याच्या कठोर परिश्रमामुळे तालुक्यातील उसाचे यशस्वी गाळप झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

नेवासे तालुका उसाचे आगार समजले जात आहे. दोन वर्षांपासून पाऊस पाणी चांगले झाल्याने व अतिवृष्टी, रोगराई, खरीप रब्बी हंगामातील पिकांना मिळणारा तुंटपुजा भाव यामुळे शेतकरी उसाच्या शेतीकडे वळला. मुळा धरणात समाधानकारक पाणीसाठा यातून ऊस शेती उभी राहिली. त्यामुळे तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले. मुळा, ज्ञानेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात प्रंचड उसाचे उत्पन्न झाले. पण याच उसाचे गाळप करण्यासाठी योग्य नियोजनामुळे मुळा साखर कारखान्याकडून पंधरा लाख ३० हजार टनाचे गाळप झाले. तर गळीतात राज्यात तिसऱ्या क्रमांकावर गेलेल्या लोकनेते मारोतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून १६ लाख ६१ हजार टनाचे विक्रमी गाळप झाल्याने कार्यक्षेत्राला आधार मिळाला आहे.

हंगामाचे योग्य नियोजन
मुळा सहकारी साखर कारखाना ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख व तालुक्याचे लोकप्रतिनिधी तथा मंत्री शंकरराव गडाख यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली चालू वर्षी गळीत हंगामाचे योग्य नियोजनामुळे कार्यक्षेत्रातील ऊस गळितास गेल्याने शेतकरी समाधानी आहे.''
भाऊसाहेब सांवत, चेअरमन, रस्तापूर, सोसायटी.

बातम्या आणखी आहेत...