आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य सुविधा:स्वाराती अस्थिरोग विभागामध्ये सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वी

अंबाजोगाई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थिरोग विभागाने आता आपली कात टाकली असून अत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया आता या रुग्णालयात सहज शक्य होऊ लागल्या आहेत. अलीकडेच कंबरेतील सांधा बदलण्याची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहे.

अंबाजोगाई स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचा अस्थीरोग विभाग हा गेली काही वर्षांपासून दुर्लक्षित विभाग समजला जात होता. या विभागात पदव्युत्तर शिक्षण नसल्यामुळे पुरेसा स्टाफ या विभागाला मिळत नव्हता व स्टाफ नसल्यामुळे उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना तज्ञ डॉक्टरांच्या कडुन उपचार ही मिळत नव्हती.वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थीरोग विभागात पदव्युत्तर शिक्षण सुरु करण्यासाठी केंद्र शासनाच्या एमसीआय कडुन नव्याने तपासणी करवून घेण्यात आली आणि या विभागाच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी मान्यता मिळाली.एमसीआयच्या तपासणी पार्श्वभूमीवर या विभागात तज्ञ सहयोगी प्राध्यापकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या डॉ. दीपक लामतुरे यांची अस्थीरोग विभागात नियुक्ती झाली. त्यानंतर विभागाने आपली कात टाकली आहे.

अंबाजोगाई शहरातील मोची गल्ली भागातील ६० वर्षीय मेघराज चौधरी हे सांधेदुखीने वर्षभर त्रस्त होते. त्यांनी या उपचारासाठी हैदराबाद, पुणे, मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेवून उपचार घेतले, सर्व डॉक्टरांनी यावर शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. यासाठी किमान ५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. चौधरी यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे म्हणून त्यांनी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थिरोग विभाग प्रमुख डॉ. दीपक लामतुरे यांच्या सल्ला घेत याच रुग्णालयात कंबरेतील सांध्याचे प्रत्यारोपणाची अवघड शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.डॉ. दीपक लामतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक विभाग प्रमुख डॉ. नामदेव जुने, डॉ. गणेश सुरवसे, डॉ. आदित्य, डॉ. सर्वेश आणि अस्थिरोग, भुलशास्त्र विभागातील इतर तज्ञ डॉक्टरांनी आणि परिचारीकांनी या शस्त्रक्रियेत सहभाग नोंदवला.

जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा
स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थिरोग विभाग तज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत आहे. पदव्युत्तर शिक्षण सुरू झाल्यामुळे रुग्णसेवा ही अधिक सक्षम झाली आहे. आता हाडांच्या सांध्यांचे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सहजपणे केली जाऊ शकते. लाभ घेण्याचे आवाहन अस्थिरोग विभागप्रमुख डॉ. दीपक लामतुरे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...