आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीक्षा सोहळा:देवगडला शुक्रवारी उत्तराधिकारी दीक्षा सोहळा; कृष्णा महाराज मते नवे उत्तराधिकारी

कुकाणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे तालुक्यातील सद्गुरु किसनगिरी बाबांनी स्थापित केलेले भगवान श्रीदत्तप्रभूंचे स्थान म्हणजे श्रीक्षेत्र देवगड संस्थान येथे मठाधिपती भास्करगिरी महाराज यांनी आपल्या अध्यात्मिक कार्यासाठी उत्तराधिकारी म्हणून कृष्णा महाराज मते यांची निवड केली. तो उत्तराधिकारी दीक्षा समारंभ ६ मे रोजी श्रीदत्त मंदिर संस्थान श्रीक्षेत्र देवगड येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राज्यासह देशभरातील संतांना निमंत्रित करण्यात आले आहे.

यापैकी काही संतांचे देवगड येथे आगमन झाले आहे. कार्यक्रमासाठी संपूर्ण देवगड परिसर सडा, रांगोळी, फुलांनी सजवण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी व्यासपीठ, बिछायत, रंगमंच व्यवस्था ही औरंगाबाद येथील जाधव मंडप डेकोरेटर्सचे रखमाजी जाधव व कल्याण जाधव करत आहेत. ध्वनी व्यवस्था ही रामेश्वर शिंदे (टाकळीभान) आणि कार्यक्रम सर्वांना पाहता यावा यासाठी चित्रीकरण एलईडीवर प्रक्षेपण रवी शेरकर यांचा समूह करत आहे.

उत्तराधिकारी पंच संस्कार दीक्षा सोहळा हा वेदशास्त्रसंपन्न गणेशगुरु ज्ञानेश्वर नगर यांच्या पौरोहित्याखाली श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर, श्रीक्षेत्र पैठण, श्रीक्षेत्र राक्षस भुवन, श्रीक्षेत्र प्रवरासंगम आदी तीर्थक्षेत्राहून ब्रह्मवृंद हे देवगडमध्ये दाखल झाले आहेत. व्यवस्थेच्या दृष्टीने गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी भक्तांच्या वेगवेगळ्या कमिट्या स्थापन करत नियोजन केले. ज्यामध्ये आलेल्या भक्तांसाठी आसन व्यवस्था, साधुसंत यांचे पूजा विधी, प्रसाद व्यवस्था, अन्नपूर्णा कक्षामध्ये आलेल्या सर्व भक्तांना प्रसादाची व्यवस्था असल्याने प्रसाद बनवण्याच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. कुठेही अस्वच्छता निर्माण होऊ नये म्हणून दक्षता घेण्यात येणार आहे.

आलेल्या पाहुणे, यात्रेकरू, साधुसंत यांच्यासाठी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली. दुचाकींसाठी स्वतंत्र अशा रांगा तयार करण्यात आली आहे. पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ भक्त तसेच नगर, टाकळीभान, ज्ञानेश्वरनगर, गोगलगाव, गंगापूर तालुक्यातील काही गावे हे सेवेसाठी येणाऱ्या भक्तांच्या स्वागतासाठी दाखल झाली आहेत. भक्तांना स्वच्छ व थंड मिनरल वॉटरची व्यवस्था जागोजागी केली.

बातम्या आणखी आहेत...