आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी मेळावा:अगस्ति तील साखर उत्पादनाचे प्रमाण समाधानकारक नाही; चांगले बेणे लावा

अकोले4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ुटचे प्रशिक्षण घेऊन शेतकरी ऊस उत्पादनात वाढ करतात. नव्या परिक्षण व अनुभवातून २०० हेक्टपर्यंतचे ऊस उत्पादन शेतकरी घेत आहेत. अगस्तिचे आजचे ऊस उत्पादन हेक्टरी ५८ मेट्रिक टन आहे. पण ते एकरी आणण्याचे प्रयत्न करा. अगस्तितील साखर उत्पादनाचे प्रमाण समाधानकारक नाही. शास्त्रोक्त पद्धतीने ऊस शेती केली पाहिजे. उसाची एक जात (वाण) तयार करायला किमान १६ वर्षे लागतात. मलाही ३५ वर्षात ५ जाती निर्माण करता आल्या. उसाची पहिली जात कोईमतूर शोधली. कोईमतूर उसाचे माहेरघर असून तेथे ऊसाच्या ९ हजार जाती उपलब्ध आहेत. तेथूनच ऊस संशोधन करून भारतभर ऊस बेणे जाते. हेही काम वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटमार्फत होतेय. मात्र आपल्याकडे फक्त ५ जातीच प्रचलित आहेत. लागवडीचे ऊस बेणे शुद्ध बीज हवे, रोगट नको, असा सल्ला पुणेस्थित वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे ऊस प्रजनन विभाग प्रमुख व शास्त्रज्ञ डॉ. रमेश हापसे यांनी दिला.

मंगळवारी इंदोरी फाट्यावरील साई लॉन्सवर शेतकरी मेळावा व ऊस पीक परिसंवाद आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी अगस्ति कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर हे होते. आमदार डॉ. किरण लहामटे यांनी उद्घाटन केले. दीपप्रज्वलन करून महर्षी अगस्ति ऋषी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून स्मार्टकेम टेक्नॉलॉजीचे मुख्य व्यवस्थापक योगेश म्हसे उपस्थित होते. व्यासपीठावर अगस्तिचे माजी अध्यक्ष प्रकाश मालुजकर, उपाध्यक्ष अशोक भांगरे, अॅड शांताराम वाळुंज, अजित देशमुख, माधव हासे, शरद देशमुख उपस्थित होते.

अगस्तिचे अध्यक्ष गायकर म्हणाले, अगस्तिचे दैनंदिन गळीत ३६०० मेट्रिकटन सुरू आहे. हंगामाची सुरुवात सुरळीत झाली. गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यातून अतिवृष्टी होतेय. याचा परिणाम उसाच्या २६५ वाणावर तांबेरा रोग पडला आहे. मोठे आव्हान कार्यक्षेत्रात भेडसावतेय. अगस्ति बंद पडू देणार नाही. तो पुढच्या काळातही सुरूच राहील. पेमेंट वेळेवर मिळेल. याबाबत अनेक अफवा पसरवण्यात येत आहेत पण शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. शरदचंद्र पवार, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अगस्तिचा गळीत हंगाम पुढच्या वर्षीही वेळेवर सुरुवात होईल, असा विश्वास गायकर यांनी व्यक्त केला. मेळाव्यास कैलास वाकचौरे, मीनानाथ पांडे, अशोक देशमुख, मच्छिंद्र धुमाळ, पाटीलबुवा सावंत, विक्रम नवले, मनोज देशमुख, सुधीर शेळके, विकास शेटे, प्रदीप हासे उपस्थित हाेते.

पुढील काळात गट शेती फायदेशीर
अकोल्यात को-व्हीएसआय १८१२१, ८००५ जातीचे ऊस घ्या, त्यावर रोग कमी येतो, साखर जास्त असते, टनेल जास्त देते, उनी लागत नाही. रानडुक्कर, कोल्हे व प्राणी त्रास देत नाहीत. हवेतील फुकट मिळणारे ७८ टक्के नत्र (नायट्रोजन) घटक आहे, ते ऊसाला मिळवून द्यावे. ऊसपिकावर ४० प्रकारची कीड व रोग येतात. बीजी देशात ३५ खोडवे घेतात. कौटुंबिक वाटपात जमिनीचे वाटप झाल्यानंतर क्षेत्र कमी होत गेले आहे. म्हणूनच यापुढील काळात गट शेती फायदेशीर ठरेल. सध्या नोकरी व व्यवसायाचे अशाश्वत आहे. पण शेती मात्र शाश्वत आहे, असे हापसे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...