आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालयात उपचार:पोलिस अधीक्षकांच्या दालनाबाहेर युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न ; तिसऱ्या घटनेमुळे खळबळ

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस अधीक्षकांच्या दालनाबाहेरच एका युवकाने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. दिगंबर संतराम शिंदे (वय २२, रा. लाडजळगाव, ता. शेवगाव) असे या युवकाचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एक ते दीड वर्षात पोलिस अधीक्षक कार्यालयात तिसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न होण्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, शिंदे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिस अधीक्षक राकेश ओला हे प्रशासकीय कामानिमित्त बाहेरगावी आहेत. शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास शिंदे हा पोलिस अधीक्षक कार्यालयात आला व पोलिस अधीक्षकांच्या दालना बाहेर असलेल्या बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी जाऊन बसला होता. त्यानंतर काही वेळातच त्याने त्याच्याकडील बाटली काढून विषारी औषध प्राशन केले. तेथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब येताच, त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना दिली. शहर विभागाचे उपअधीक्षक अनिल कातकडे, गृह शाखेचे उपअधीक्षक मेघशाम डांगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपाधीक्षक कातकडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तात्काळ कर्मचाऱ्यांना बोलावून घेत शिंदे याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना केले. दरम्यान, प्रेम संबंधातून घडलेल्या एका घटनेप्रकरणी शिंदे याने शेवगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. यासंदर्भात तो पोलिस अधीक्षक कार्यालयात आलेला होता, असे उपअधीक्षक कातकडे यांनी सांगितले.

या आधीही दोघांनी केला होता आत्महत्येचा प्रयत्न मागील एक ते दीड वर्षात पोलिस अधीक्षक कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न करण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी शिरूर येथे एका पोलिस कर्मचाऱ्याने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तर बेलवंडी येथील एका युवतीने कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला होता.

बातम्या आणखी आहेत...