आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रेमविवाहास आईचा विरोध असल्याने मुलीने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात बहिणीचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोन मुलींच्या मृत्यूनंतर आईनेही घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मन्याळे शिवारात बुधवारी सकाळी ही घटना घडली. सुनीता अनिल जाधव (४०), प्राजक्ता अनिल जाधव (२२) व शीतल अनिल जाधव (१८, सर्व रा. मन्याळे, ता. अकोले) अशी मृतांची नावे आहेत.
भाचा संदीप नंदराज डोळसच्या फिर्यादीनुसार आपल्या घरासमोरच मामी सुनिता अनिल जाधव राहत होत्या. मामा अनिल जाधव यांचा २०१० मध्ये मृत्यू झाला आहे. धाकटी मुलगी शीतलने १४ फेब्रुवारीला जुन्नर येथे तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. मात्र, त्यास मामीचा विरोध होता. तसे त्यांनी तरुणालाही सांगितले होते. आईच्या विरोधानंतरही शीतल बुधवारी पतीसोबत बोलत असल्याच्या कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. रागाच्या भरात शीतल शेतात गेली, तिला बोलावण्यासाठी थोरली मुलगी प्राजक्ताही मागून गेली. मात्र, बराच वेळ होऊनही दोघी न परतल्याने सुनीताही शेतात गेल्या. त्यानंतर पुन्हा घरी येऊन त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
सरपंचासह दोघांची शेतात धाव
शीतल आणि प्राजक्ता या बहिणी घरी नसल्याने फिर्यादी डोळस व सरपंच अमित कुऱ्हाडे यांनी शेतात धाव घेतली. शीतलने विहिरीत उडी मारल्यानंतर तिला वाचविण्यासाठी थोरली बहिण प्राजक्तानेही पाण्यात उडी मारल्याचे निदर्शनास आले. त्यात पाण्यात बुडून दोघींचाही मृत्यू झाला. विहिरीतील पाणी उपसल्यानंतर दोघींचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.