आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निधी वाटपावरून नाराजी:काँग्रेस चौथ्या नंबरचा पक्ष असून त्यांना लॉटरी लागली, मात्र तरीही त्यांचे तिकीट कोणी फाडत नाही - सुजय विखे यांनी लगावला टोला

अहमदनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुजय विखे - फाइल फोटो
  • आता एक पक्ष नाराज, पुढच्या काळात सर्वच पक्षांची नाराजी बाहेर येईल, सुजय विखेंची भविष्यवाणी

नगरविकास खात्याच्या निधी वाटपामध्ये काँग्रेसच्या बाबतीत दुजाभाव केला जात असल्याने काही आमदारांमध्ये नाराजी होती. याबाबत त्यांनी बोलूनही दाखवले होते. यावरून आता भाजपचे खासदार सुजय विखे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. आता एका पक्षाची नाराजी बाहेर आली, मात्र पुढच्या काळात सर्वच पक्षाची नाराजी बाहेर येईल असे विखे म्हणाले. तसेच काँग्रेस चौथ्या नंबरचा पक्ष असून त्यांना लॉटरी लागली आहे. मात्र तरीही त्यांचे तिकीट कोणी फाडत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

सुजय विखे म्हणाले की, ''तीन पक्षांच्या सरकारमध्ये सर्वांचे समाधान करणे अवघड असते. तसेच ज्या खात्याचा मंत्री त्याच पक्षाचे काम होते. त्यामुळे बाकीचे नाराज होतात. हे सर्व स्वार्थासाठी एकत्र आले आहे. मंत्री समाधानी आहेत. मात्र आमदार नाराज आहे. महाराष्ट्राचा विकास थांबेल त्यांचा जो काही अंतर्गत प्रश्न आहे तो त्यांनी सोडवून घ्यावा. तसेच आता एका पक्षाची नाराजी बाहेर आली आहे. मात्र पुढच्या काळात सर्वच पक्षाची नाराजी बाहेर येईल,'' अशी भविष्यवाणी खासदार सुजय विखे यांनी केली आहे.