आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगरचे नाव अहिल्यादेवीनगर करावे, अशी मागणी भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. मात्र यावरुन भाजपमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी पडळकरांवर जोरदार हल्लाबोल केला आहे, विखे पाटील यांनी पडळकरांवर आरोप केला आहे की, हा समाजात विष कालविण्याचा प्रयत्न आहे.
पडळकरांची मागणी काय?
अहमदनगरचे नाव अहिल्यादेवीनगर करावे, अशी मागणी भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. त्यानुसार प्रशासकीय पातळीवर हालचालीही सुरू झाल्या आहेत. तर विधान परिषदेतही पडळकरांना सकारात्मक उत्तर दिल्याने जिल्ह्यातही यावर चर्चा सुरू झाली आहे. यावर खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, अहमदनगर शहर व जिल्ह्याचे नाव बदलावे किंवा विभाजन करावे अशी मागणी माझ्याकडे कुणी केली नाही, असे म्हणत ही मागणी स्थानिकांची नाही असे म्हणतांना भूमिपुत्रांकडून मागणी आली असती तर त्याला काही महत्त्व आले असते असे म्हटले आहे.
खासदार सुजय विखे पाटील म्हणाले की, अहमदनगरची परंपरा वेगळी आहे, भूमिपुत्रांकडून मागणी केली जात नाही तो पर्यंत जिल्ह्याबाहेरील कोणत्याही व्यक्तीने नामांतराची मागणी करणे संयुक्तिक वाटत नाही. अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा जिल्हा आहे. सामाजिक सलोखा अनेक वर्षे या जिल्ह्याने टिकवून ठेवला आहे, त्यामुळे समाजात विष कालविण्याचा प्रयत्न करु नये, जनतेने मागणी केली तर नगरसेवक, आमदार, खासदार मिळून निर्णय घेतली आणि मी यात पक्ष म्हणून नाही तर जनतेच्या बाजूने असेल असे स्पष्ट मत व्यक्त करत पडळकरांना अहमदनगरच्या राजकारणात न पडण्याचा इशाराच सुजय विखे यांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.