आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागापूर MIDCचे विस्तारीकरण:वडगाव गुप्ता, पिंपळगाव माळवी परिसरातील आरक्षित क्षेत्रातून बागायती क्षेत्र वगळणार सुजय विखेंची माहिती

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर शहरातील नागापूर औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी वडगाव गुप्तामध्ये 220 हेक्टर खासगी व 23 हेक्टर सरकारी तसेच पिंपळगाव माळवीमध्ये 217हेक्टर असे मिळून 461 हेक्टर क्षेत्र आरक्षित करण्यात आली होती. शेतकर्‍यांच्या सात-बारावर एमआयडीसीचे शिक्के पडले आहेत. मात्र या परिसरात 60 टक्के बागायती क्षेत्र आहे. त्यामुळे हे क्षेत्र वगळावे यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा केला असून, त्यांनी मान्यता दिल्याने आता दोन दिवसात गॅझेटमध्ये नोंद होईल व या जमिनी मोकळ्या होतील, असा विश्वास भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी शुक्रवारी (3 मार्च) ला पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

डॉ. विखे म्हणाले, अहमदनगर शहरात वसाहत वाढीला अडचणी आहेत. मुळा धरणातून सुपा व अहमदनगर एमआयडीसी, नगर शहर व छावणी परिषदेला पाणी तसेच राहुरी,नेवासे, शेवगाव व पाथर्डी भागाला पाणी दिले जाते. विना पाण्याची एमआयडीसी नगरला होऊ शकत नाही. त्यामुळे मुळा धरणातील गाळ काढून त्याची पाणी साठवण क्षमता वाढीचा प्रस्ताव दिला असून, त्यावर लवकरच निर्णय होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पारनेर तालुक्यातील सुपे येथे औद्योगिक कंपन्यांसाठी भरपूर जागा आहे, पणं अहमूनगरचे उद्योजक तिकडे जायला तयार नाहीत. तेथील मित्सीबिशी कंपनीनेही तेथील प्रकल्प रद्द केला आहे. व जपानच्या एका कंपनीने उद्योजकांना तेथे होणार्‍या त्रासाचे पत्र पोलिस अधीक्षकांना दिले आहे. त्यामुळे तेथील गुंडगिरी व अन्य त्रासाबाबत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत उद्योजकांची बैठक घेणार असल्याचेही डॉ. विखे यांनी सांगितले.

पुढच्या महिन्यात उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कुकडी प्रकल्प चतुर्थ सुधारित प्रशासकीयमान्यता बैठकीत जिल्ह्यातील साकळाई पाणी योजना, डिंबे बोगदा व कुकडीच्या नगर जिल्हा हद्दीतील 100 किलोमीटर कालव्याचे अस्तरीकरण असे तीन प्रकल्प घेण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.

कायदा सुव्यवस्था ढासळली असे मी म्हणणार नाही

अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शहराची कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याचे निवेदन दिले होते. यावर डॉ. सुजय विखे म्हणाले,अहमदनगर शहर व जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली असे मी म्हणणार नाही. पण जिल्ह्यात एसपींपासून सर्वच अधिकारी नवे असल्याने त्यांना थोडा वेळ द्यायला हवा असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...