आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:कोपरगाव तालुका नागरी बँक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुपेकर

कोपरगाव शहर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव पिपल्स बँक व गौतम सहकारी बँकेचे सेवकांचे पतसंस्थेच्या संचालक मंडळाची सन २०२२-२०२७ करीता निवडणूक पार पडली. ही निवडणूक बिनविरोध होऊन संचालक पदी सुरेश देशमुख, राजेंद्र पवार, दिलीप उगले, विष्णू होन, संजय ठाणगे, किशोर आगवन, दत्तू वाघ, शैलेश कदम, राजेंद्र सुपेकर, प्राजक्ता श्रॉफ, मंगल सदाफळ यांची बिनविरोध निवड झाली.

या पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजेंद्र सुपेकर यांची, तर उपाध्याक्षपदी दत्तू वाघ यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजेंद्र राहाणे यांनी काम पाहिले. यावेळी पिपल्स बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक एकबोटे व गौतम बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बापूसाहेब घेमुड,विठ्ठल रोठे, चंद्रशेखर व्यास यांनी सदर निवडीबद्दल अभिनंदन केले, सेक्रेटरी जितेंद्र छाजेड व प्रदीप मेढे यांनीही नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...