आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी दौरा:पोलिस अधीक्षकांची ‘कोतवाली’त झाडाझडती; तीन दिवस चालणार दप्तर तपासणी

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मध्यवर्ती भागाच्या कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या कोतवाली पोलिस ठाण्याची दप्तर तपासणी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडून सुरू करण्यात आली आहे. त्यांनी सोमवारी सकाळी पोलिस ठाण्यास भेट देऊन पाहणी केली.

यावेळी पोलिस निरीक्षक संपत शिंदे, सहायक निरीक्षक प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. शहरातील मध्यवर्ती भागाची जबाबदारी कोतवाली पोलिस ठाण्यावर आहे. येथे दाखल होणार्‍या गुन्ह्यांचेप्रमाण जास्त आहे. अधीक्षक पाटील यांनी सोमवारपासून कोतवालीची दप्तर तपासणी मोहिम सुरू केली आहे. त्यांनी सोमवारी सकाळी पोलिस ठाण्यात भेट दिल्यानंतर अंमलदारांकडील गुन्ह्यांची, तपासाची पडताळणी केली.

दरम्यान, कोतवाली पोलिस ठाण्यातील जप्त केलेल्या गुन्ह्यातील मुद्देमालामध्ये तफावत आढळून आल्याने याप्रकरणी स्वतंत्रपणे चौकशी सुरू आहे. अधीक्षक पाटील पुढील दोन ते तीन दिवस कोतवालीचे दप्तर तपासणार आहेत. याकाळात दाखल गुन्हे, गुन्ह्यांचा निपटारा, मुद्देमाल आदींची तपासणी केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...