आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहावितरणचे अधिक्षक अभियंता सुनील काकडे यांची मुख्य अभियंतापदी पदोन्नती झाली आहे. त्यांंनी भांडूप परिमंडळाच्या मुख्य अभियंता म्हणून पदभार घेतला आहे. या पदोन्नतीबद्दल नगर महावितरण परिमंडळाच्या वतीने सत्कार करून निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. नगर परिमंडळाचे प्रभारी प्रशासन अधिक्षक अभियंता कैलाश जमदाडे यांच्या हस्ते सुनील काकडे यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी कार्यकारी अभियंता शहर विभाग दीपक लहामगे, ग्रामीण विभाग कार्यकारी अभियंता लक्ष्मण काकडे, संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात, स्थापत्य विभाग कार्यकारी अभियंता निलेश चालीकवार, विष्णू नवले, अनुदेशक कपिल रोडे, ललित खाडे आदींसह महावितरणचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सत्कारास उत्तर देताना अधिक्षक अभियंता सुनील काकडे यांना भरून आले. ते म्हणाले, सर्व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कौतुकाच्या वर्षामुळे मी भारावून गेलो आहे. येथील सव्वा वर्षाच्या कार्यकाळात सर्वांनी जे प्रेम दिले ते कधीही विसरू शकणार नाही. येथील प्रत्येक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी भरपूर सहकार्य केल्यानेच मी येथे काम करू शकलो. नगर सर्कलचा आलेख वाढवण्यात प्रत्येक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी भरपूर कष्ट घेतले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.