आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवार यांची टीका:राज्य सरकारकडून अंधश्रद्धेला खतपाणी ; 17 डिसेंबरला महाविकास आघाडी सरकारचा मोर्चा

श्रीगोंदे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील सरकार धूळफेक व अंधश्रद्धा वाढवत आहे. त्यांना जबाबदारीचे भान नाही. सत्तेतील मंत्री प्रवक्ते रोज बेताल वक्तव्य, तर राज्यपाल राष्ट्रपुरुषांचा अपमान करीत आहेत. कायदा सुव्यवस्थेची ऐसे तैसे करणाऱ्या सरकारचे आत्ता खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला.

शनिवारी कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना पिंपळगाव पिसा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, राज्यात खरिपाचे पिके वाया गेली. खते, औषधे, बी-बियाणे डिझेल, पेट्रोल, गॅस, महागाई वाढली आहे. कोरोनानंतर गोवर, जनावरांना लंपी आजाराने ग्रासले आहे. पिक विमा भरून घेतला परंतु भरपाई देण्याऐवजी विमा कंपन्या ऑफिस बंद करून गायब झाले आहेत.

तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तोंडी सांगतात विज बिल भरू नका, मात्र लेखी आदेश काढत नाहीत. विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांचे वीज पुरवठा कट करत आहेत. सहा महिन्यापूर्वी शिंदे फडवणीस सरकारमध्ये ४० दिवस दोघेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते. मंत्रीमंडळ विस्तारानंतर बिनकामाचे मंत्री केले. सरकारविरोधात बोलले की त्याला ईडीची भीती दाखवून जेलमध्ये टाकते. १७ डिसेंबरला महाविकास आघाडी मोर्चा काढणार आहे.

माजी आमदार राहुल जगताप म्हणाले, भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांनी ४० वर्षे सत्ता उपभोगली. ते विकासकामांच्या बाबतीत शब्दही काढत नाहीत. स्व. शिवाजीराव नागवडे आणि कुंडलिकराव जगताप आजारी असताना त्यांची टिंगलटवाळी करत होते. आता तालुक्याची रस्ते वीज पाणी याबाबत काहीच बोलत नाहीत. त्यांचे घरही आता ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे राहून फुटले आहे, असे जगताप म्हणाले.

स्वबळाची भाषा नको आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, मार्केट कमिटी, विधानसभा या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्र बसूनच निर्णय घेणार आहे. मागील विधानसभेला घनश्याम शेलार अवघ्या २४०० मतांनी पराभूत झाले. स्वबळाची भाषा करू नका, औकात असेल तर लढा. पण हरल्यानंतर गाठ अजितदादाशी असे आहे, असे अजित पवार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...