आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:बालघर प्रकल्पातील मुलींच्या शिक्षणासाठी मदत

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्य पूर्व काळात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. त्यामुळेच आज सर्वच क्षेत्रात महिला आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवत आहेत. शिक्षणामुळेच प्रगती होते.‌स्वप्न साकारले जातात. सावित्रीबाई फुले यांनी प्रज्वलित केलेली ज्ञान ज्योत समाजासाठी आदर्शवत आहे, असे प्रतिपादन जय आनंद महावीर युवक महिला मंडळाच्या अध्यक्षा संध्या मुथा यांनी केले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मंडळातर्फे तपोवन रोडवरील बालघर प्रकल्पातील मुलींच्या शिक्षणासाठी व्हाईट बोर्ड, सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा तसेच विविध प्रेरणादायी पुस्तके भेट दिली. ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात पाहणी केल्यानंतर मंडळाच्या सदस्यांनी बालघर प्रकल्पाचे युवराज गुंड यांच्याकडे मदत सुपुर्द केली. यावेळी संग्रहालयाचे अभिरक्षक प्रा. संतोष यादव, मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, आनंद मुथा, सुरेखा बोरा, मयुरी सावदेकर, राधिका कासवा, दीपाली मुनोत, स्वाती गांधी, गुंजन भंडारी, पूजा गांधी, सपना गुगळे, सोनाली बोरा, भाग्यश्री गांधी, सविता मुथा, राहुल सावदेकर, सत्येन मुथा, बाबालाल गांधी आदी उपस्थित होते. शैलेश मुनोत म्हणाले, जय आनंद महावीर युवक मंडळाला सामाजिक कार्याची मोठी परंपरा आहे. महिलाही सुरूवातीपासून या कार्यात योगदान देतात.‌ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना मुलींच्या शिक्षणासाठी महिलांनी केलेली मदत अतिशय कौतुकास्पद आहे.

युवराज गुंड म्हणाले, सावित्रीबाई फुले यांनी बहुजन वर्गाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले. आजच्या काळातही एक मोठा वर्ग शिक्षणापासून वंचित आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बालघर प्रकल्प प्रयत्न करत आहे. यासाठी जय आनंद महावीर युवक मंडळाकडून मिळालेली मदत व पाठबळ ऊर्जा देणारे आहे. मयुरी सावदेकर यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...