आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हक्काचे उमेदवार:आमदार गडाख यांचे हात बळकट करण्यासाठी साथ द्या : प्रा. गडाख

सोनई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद व पंचायत समित्या या ग्रामीण भागात विकासासाठी महत्वाच्या असतात. आमदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात ही, तालुक्यातील विकासासाठी प्रत्येक गटात गणात जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीत आपले हक्काचे उमेदवार आपल्याला निवडून आणावे लागतील. त्यासाठी आपण सर्वांनी आमदार गडाख यांचे हात बळकट करण्यासाठी साथ द्या, असे आवाहन प्रा. जयश्री गडाख यांनी केले

रामडोह येथे आमदार गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली व सुनील गडाख यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर २ शाळा खोल्या इमारतीचे भूमिपूजन गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.प्रसंगी गडाख या बोलत होत्या. यावेळी सरपंच ज्ञानेश्वर बोरूडे, बाळासाहेब गोरे, बाळासाहेब बोरूडे, भारत गुंजाळ, शहाजी गढेकर, अशोक गुजांळ, ताराबाई परसैय्या, बापूराव गुजांळ, राजाराम जाधव, बाळासाहेब फोलाणे उपस्थित होते. प्रास्ताविक बाळासाहेब गोरे यांनी, तर आभार बापूराव गुजांळ यांनी मानले.

वरखेड ता नेवासा येथे जिल्हा परिषद शाळेत वर्ग खोल्यांची मोठी गैरसोय होती आ शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती सुनीलराव गडाख यांनी २ खोल्यांना निधी दिल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होईल.'' ज्ञानेश्वर बोरुडे, सरपंच रामडोह.

बातम्या आणखी आहेत...