आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व्हे:शिक्षणाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुळा गटात उसतोड मुलांचा सर्व्हे

सोनई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऊसतोडणी कामगार मुलांचे शैक्षणिक नुकसान होवू नये, याकरिता शासनाच्या हंगामी स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्याची योजना म्हणून सोनई येथील मुळा साखर कारखाना गट भागात जिल्हा प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील व शिक्षकांनी मुला-मुलींचा सर्व्हे करुन शैक्षणिक सुविधेची तयारी केली.

मुळा गट परीसरात असलेल्या उसतोड कामगारांच्या कोप्यात जावून भास्कर पाटील यांनी सोबत आलेल्या मुलांची माहिती जाणून घेतली. दोन दिवसात पालक मेळावा घेवून ते राहत असलेल्या ठिकाणी शैक्षणिक सुविधा व आहार वाटपाचे नियोजन करण्यात यावे अशी सुचना त्यांनी केंद्र प्रमुख आसाराम कदम व शिक्षकांना केली. यावेळी उपस्थित मुलांना गणवेश व शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी मुळा कारखाना जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत फुंदे, तिरमलवस्ती शाळेचे मुख्याध्यापक संदीप सोनवणे, पत्रकार विनायक दरंदले, बाळासाहेब पाटोळे, ठकाजी टकले, अरुण पालवे, न्यु इंग्लिश स्कूलचे बाबासाहेब पटारे व सचिन आढाव उपस्थित होते. मुळा कारखाना याठिकाणी शैक्षणिक वर्ग भरण्याची सुविधा करुन देणार असून सोमवारपासून शिक्षणाचे धडे सुरु होणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...