आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाखला:30 जूनपर्यंत हयातीचे दाखले सादर करावे ;  शासननिर्णयानुसार विविध शासकीय योजनांचा  लाभ

नगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील शासननिर्णयानुसार विविध शासकीय योजनांचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले तसेच उत्पन्नाचे दाखले ३० जूनपूर्वी सादर करणे आवश्यक आहे. संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ,विधवा,दिव्यांग निवृत्तीवेतन योजना लाभार्थी यांचेकडून हयात दाखले व उत्पन्न दाखले अदयाप प्राप्त झालेले नाहीत. ज्या लाभार्थ्यानी अदयाप दाखले दिलेली नाहीत त्यांनी ३० जून पर्यंत संबंधित बॅंक अथवा संबंधीत तलाठी यांचे मार्फत हयात दाखले तात्काळ जमा करावेत असे अवाहन करण्यात येत आहे. अन्यथा लाभार्थीचे अनुदान बंद झाल्यास त्यास संबंधीत लाभार्थी जबाबदार राहतील, असे पारनेरच्या तहसिलदारांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातम्या आणखी आहेत...