आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या विकास कामाचा धसका घेऊन शहरातील काही लोकांना सध्या आमदार संग्राम जगताप यांच्यावर टीका करणे, एवढाच उद्योग राहिला आहे. स्वत:चे राजकीय अस्तित्व संपण्याच्या स्थितीत असलेली ही मंडळी महानगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून येऊ शकत नाही.
सुवेंद्र गांधी यांनी पालिकेच्या जागेत त्यांच्या निवासस्थानाचे अतिक्रमण केल्याचे सर्वांना माहिती आहे. अशा व्यक्तीने रस्ते विकासाबद्दल बोलणे हस्यास्पदच आहे, अशा शब्दात नगरसेवक विपुल शेटीया यांनी गांधी यांना प्रत्युत्तर दिले आहे. सीना नदीवर पुलासाठी मंजूर झालेल्या निधीवरून श्रेयवाद रंगला आहे.
सुवेंद्र गांधी यांनी जगताप यांच्यावर टीका केल्यावर राष्ट्रवादीच्या वतीने शेटीया यांनी प्रत्युत्तर देत अर्बन बँक बुडवण्याचे श्रेयही सूवेंद्र गांधी यांनी घ्यावे, असा टोला लगावला आहे. शेटीया यांनी म्हटले की, कल्याण रोड भागातील नागरिकांची होणारी अडचण लक्षात घेऊन तेथील सीना नदीवर उड्डाणपुल होणे ही खूप महत्त्वाची गरज होती.
आमदार जगताप यांनी सर्व पातळीवर सातत्याने पाठपुरावा करून या पुलाकरिता सुमारे २४ कोटी मंजूर करुन आणले. २४ मार्च २०२३ रोजीच्या मंजूर कामाशी स्व. खा. दिलीप गांधी यांचा संबंध कसा जोडला जाऊ शकतो, याचा अभ्यास आपण करावा. आमदार जगताप यांनी विविध पातळीवर केलेल्या पाठपुराव्याची सर्व स्तरावर नोंद आहे.
या ला मंजुरी मिळाल्याने आमदार जगताप यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाल्याने काहीना पोटदुखी झाली. यातूनच सुवेंद्र गांधी यांनी जगताप यांच्यावर हास्यास्पद टीका केली आहे. शहराचे भूषण असलेली नगर अर्बन बँक बंद पाडण्याच्या उंबरठ्यावर आणून ठेवल्याचे पाप केले. बँकेतील गोर-गरीब ठेवीदारांचे कष्टाचे पैसे परत करा, नंतरच इतर गोष्टीमध्ये नाक खुपसावे, असा खोचक सल्लाही शेटीया यांनी दिला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.