आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित नेवासा खुर्द केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेमध्ये नेवासा मुले शाळेचे वैयक्तिक व सामूहिक स्पर्धेत घवघवीत सुयश मिळवले. नुकत्याच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कडा कॉलनी मुकिंदपुर शाळेच्या प्रांगणात संपन्न झालेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये किलबिल गटात वरद गायके, बाल गटात शौर्य आठरे याने प्रथम क्रमांक पटकावला.
सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत किलबिल गटात कार्तिक खामकर तर बाल गटात यशराज मोहिते याने प्रथम क्रमांक मिळवला आहे. वेशभूषा सादरीकरण स्पर्धेमध्ये बाल गटात वरद दीक्षित याने प्रथम क्रमांक तर किलबिल गटात वरद गांगर्डे यांनी द्वितीय क्रमांक संपादन केला. तीन शब्दावरून गोष्ट सादरीकरण या स्पर्धेत श्लोक मलदोडे याने किलबिल गटात प्रथम क्रमांक तर वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत किलबिल गटातून श्लोक भाकरे यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला.केंद्रात समुहगीत गायन स्पर्धेत लहान गटात “म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात’ हे गीत आदित्य कांदे, कृष्णा गायकवाड, रुद्र मस्के, रुद्र लोखंडे, श्रेयस जगताप, जैन शेख, अनुज दहिवले, सिद्धराज डौले, अनय बोरकर, यथार्थ राठोड यांनी सुरेल आवाजात गायन करत त्यास विद्यार्थी हरीश सुरडे याने खंजिरीची, साई घोलपने तबला व संगीत मार्गदर्शिका शिक्षिका अश्विनी मोरे यांनी हार्मोनियमची साथ दिली.
केंद्रस्तरीय स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा ठुबे, शिक्षक अरविंद घोडके, साईनाथ वडते, आण्णासाहेब शिंदे, राहुल आठरे, छाया वाघमोडे, प्रतिभा पालकर, मिनाक्षी लोळगे, विद्या खामकर, ज्योती गाडेकर, प्रतिभा गाडेकर, प्रतिमा राठोड आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले असून शाळेच्या वतीने त्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
यावेळी विविध गुणदर्शन स्पर्धेत मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल नेवासा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, केंद्रप्रमुख भाऊसाहेब जगताप, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा स्मिता अंबिलवादे,सदस्य, ग्रामस्थ व पालकांनी विजेत्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.