आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर:‘गांधर्व’च्या परीक्षेत ओंकार संगीत निकेतनच्या विद्यार्थ्यांचे सुयश

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या नोव्हेंबर २०२१ सत्रातील परीक्षांमध्ये भिंगारच्या ओंकार संगीत निकेतनच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.

यामध्ये गायन/हॉर्मोनियम विषयामध्ये प्रारंभिक : स्वरदा देऊळगावकर, अनुष्का गायकवाड, स्पर्शिका काटकर, अनुज दरवडे, वैष्णवी गायकवाड, प्रचेता गतखाने, आरोही सरोदे, वैष्णवी पालवे, स्वानंद सुरडकर, अनुष्का कुलकर्णी, वैष्णवी शिवलेकर, ऋतुजा ठोंबरे, पार्थो नाथ, श्रावणी व्यवहारे सर्व विशेष योग्यतेत यश मिळवले. प्रवेशिका प्रथममध्ये राधिका कोल्हे, मोक्षदा मोहिते, सई कदम, श्रावणी बोरुडे, समृद्धी बोरुडे यांनी यश मिळवले. प्रवेशिका पूर्णमध्ये मोहिका भंडारी, तन्वी ढोले यांनी विशेष योग्यतेत तर गौरी विधाटे, प्राची होवाळ, पूर्वा लकारे, साहिला कोकणे प्रथम श्रेणीत यश मिळवले. मध्यमा प्रथममध्ये स्वराज सरोदे विशेष योग्यतेत, तर अंकित पवार, पायल वाळके प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. मध्यमा पूर्णमध्ये गीतांजली सगम प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. विशारद प्रथममध्ये नेहा दरवडे, मीनाक्षी सरोदे उत्तीर्ण झाल्या.

तबला विषयामध्ये प्रारंभिक : विराज लवांडे, गोपाल कोल्हे, कृष्णा बेरड, अखिलेश शेडाळे, संकेत राऊत, कृष्णा लाढणे, नयन गोरे सर्व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. प्रवेशिका प्रथममध्ये आदित्यराज पंडित, महेश शिंदे, सम्राट डोळस, सार्थक दरवडे, अथर्व नवगिरे, प्रज्वल उडामळे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. प्रवेशिका पूर्णमध्ये वैष्णवी कोल्हे प्रथम श्रेणीत, तर मध्यमा प्रथममध्ये वैष्णव ढाकणे, रुद्रा होले, प्रथमेश शिंदे, ओंकार निमसे शाहू गवळी, सयाजी बोराडे, स्वराज तोतरे प्रथम श्रेणीत, तर मध्यमा पूर्णमध्ये आदित्य सुपेकर प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. विद्यार्थ्यांना ओंकार संगीत निकेतनच्या संचालिका संगीता देऊळगावकर, शेखर दरवडे, ओंकार देऊळगावकर यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...