आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:आरपीआयकडून स्वबळाचा नारा

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रिपाईला संपविण्याची सुपारी घेतल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (गवई) नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी केला. अकोले, अमरावती येथे येऊन मित्र पक्षाला संपविण्याची भाषा थोरात यांनी केली. काँग्रेसला ताकद देणार्‍या मित्र पक्षांनाच संपविण्याची भाषा करणारे संपल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, आरपीआयची ताकद वाढवून सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी करण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना त्यांनी दिल्या.

आरपीआय (गवई) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक नगर येथे झाली. यावेळी गवई पत्रकारांशी बोलत होते. गवई म्हणाले की, महापुरुषांबद्दल वारंवार होणारे चुकीचे वक्तव्य निषेधार्ह आहे. सर्वच महापुरुषांचे देशांच्या जडणघडणीत मोलाचे कार्य आहे. राजकारण करताना कोणत्याही महापुरुषांवर चुकीचे विधान करणे म्हणजे राजकारणातील पातळी घसरल्याचे लक्षण आहे. पूर्वी वैचारिक मतभेद होते. मात्र सध्या सर्वांचे वैयक्तिक मतभेद निर्माण झाली आहेत. या मतभेदामुळे समाजात देखील फूट पडत आहे.

पक्षाची बैठक सुरु होण्यापूर्वी एस. राजेंद्रन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. राष्ट्रीय सरचिटणीसपदी डॉ.राजेंद्र गवई, तर खजिनदारपदी रामराव दाभाडे यांची निवड करण्यात आली. ज्या पक्षाकडून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळेल, त्या पक्षाबरोबर युती केली जाणार असल्याचे सुतोवाचही गवई यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...