आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महादेव जानकर यांच्या नेतृत्वात स्वबळाचा नारा:भाजपचा मित्रपक्ष रासपची स्वबळावर लढण्याची तयारी

नेवासेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

२०१४ पासून भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने आता पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांच्या नेतृत्वात स्वबळाचा नारा दिला आहे. जिल्हा परिषद, नगर परिषद, मनपा आणि विधानसभेतही आम्ही शक्ती आजमावणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली.

भाजपविषयी नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले की, त्यांच्याशी आमची युती आहे. मात्र, २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत रासपला जागा सोडण्याबाबत त्यांनी आम्हाला न्याय दिला नाही. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व आगामी लोकसभेच्या ४८, तर विधानसभेच्या २८८ जागांवरदेखील स्वबळावर निवडणुका लढवण्याचा आमचा निर्धार असून त्यादृष्टीने कार्यकर्त्यांची बांधणी राज्यभर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आताच्या घडीला सर्वच पक्ष हे प्रस्थापितांचे पक्ष असून निवडणुका स्वबळावर लढवून सर्वसामान्य माणूस सत्तेच्या प्रवाहात येण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांची जनगणना झाली पाहिजे. ओबीसी व सर्व जातींना आरक्षण, मोफत आरोग्यसेवा आदी बारा मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून आम्ही लोकांपुढे जाणार आहोत.

बातम्या आणखी आहेत...