आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजी विक्रेत्यांना दिल्या कापडी पिशव्या:कापडी पिशव्या वापराबाबत स्वच्छता रक्षक समितीची नगरमध्ये जनजागृती

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगरमध्ये विविध क्षेत्रातिल महिला एकत्र येऊन स्थापन केलेल्या स्वच्छता रक्षक समितीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून प्लास्टिक पिशव्यांच्या वापरा विरोधात जनजागृतीची मोहीम चालवत आहेत. यासाठी प्रतिभा धूत यांच्या पुढाकारातून ५ हजार कापडी पिशव्या गरजू महिलांकडून शिवून घेतल्या. या उपक्रमांतर्गत शहरातील गाडगीळ पटांगण येथील भाजी बाजारात समितीच्या सर्व सदस्यांनी भाजी विक्रेत्यांना ग्राहकांना प्लास्टिक पिशव्या व देता कापडी पिशव्या द्या, असे आवाहन करून ५ रुपयाला कापडी पिशव्या दिल्या.

समितीचे सदस्य प्रत्येक भाजीविक्रेत्याला आणि नागरिकांना प्लास्टिक पिशव्या वापरू नका, प्लास्टिक कचरा वाढवू नका, असे समजावून सांगत होत्या. कापडी पिशवी हाच पर्याय... निसर्गाला देई न्याय... असे जनजागृतीचे फलक यावेळी भाजीविक्रेत्यांना समितीच्या वतीने देण्यात आले. सामाजिक माध्यमाद्वारे प्लास्टिक पिशव्यांच्या विरोधात जनजागृती व्हावी यासाठी समितीच्या सदस्यांनी गाण्याचा व्हिडीओ बनवून युट्यूब वर व्हायरल करण्यात आला आहे.

यावेळी स्वच्छता रक्षक समितीच्या प्रतिभा धूत, सुधा खंडेलवाल, गीता गिल्डा, ज्योती दीपक, आश्लेषा भांडारकर, संध्या जाधव, मंजू धूत, विनाया शेट्टी, शशी बिहानी, सुरेखा मणियार, प्रा.किरण कालरा आदी सदस्य उपस्थित होत्या. रोटरी प्रियदर्शनी क्लबचे सहकार्य या उपक्रमाला लाभले. प्रतिभा धूत म्हणाल्या, स्वच्छता रक्षक समितीने पुढाकार घेत प्लास्टिक विरोधात मोहीम हाती घेतली आहे. सध्या नागरिक वस्तू व भाजी आणण्यासाठी मोठ्याप्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत आहेत. प्लास्टिक कचरा ही सर्वात मोठी समस्या आपल्यापुढे उभी आहे. ती दूर करण्यासाठी प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्यांना प्राधान्य द्या यासाठी नागरिक व भाजी विक्रेत्यांना विनंती करत आहोत. गाडगीळ पटांगण येथील भाजी बाजारात या मोहिमेला प्रतिसाद मिळाला.

बातम्या आणखी आहेत...