आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचुकीची आहार पध्दती, व्यायामाचा अभाव व तणावपूर्ण जीवनामुळे बहुतेकांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी योग-प्राणायामशिवाय पर्याय नाही. घाम गाळणे म्हणजे योग नव्हे, शास्त्रीय अचूक पध्दतीने योग केल्यास त्याचे निश्चित फायदे शरीराला मिळतात, असे प्रतिपादन योग गुरु सागर पवार यांनी केले.
प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने महिलांच्या निरोगी आरोग्य आणि आनंदी जीवनासाठी योग-प्राणायामबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी योग गुरु पवार बोलत होते. याप्रसंगी मनिषा भागानगरे, गितांजली भागानगरे, ग्रुपच्या अध्यक्ष अलका मुंदडा, उपाध्यक्षा सविता गांधी, सचिव शोभा पोखर्णा, अनिता काळे, छाया राजपूत, हिरा शहापूरे, शशिकला झरेकर, स्वप्ना शिंगी, साधना भळगट, सुजाता पूजारी, सारिका कासट, जयश्री पुरोहित, उषा गुगळे आदी उपस्थित होत्या. पवार म्हणाले, तणावाने आजाराच्या उंबरठ्यावर असलेल्या व्यक्तीचे इंद्रिय त्याच्या इच्छेप्रमाणे कार्यरत नसतात.
इंद्रियांवर ताबा मिळवण्यासाठी प्राणायाम कार्य करतो. ध्यानद्वारे विचारांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करता येते. यामुळे नैराश्यपूर्ण जीवन आनंदी बनत असते. तणावामुळे जीवन निरुत्साह व व्याधींनी व्यापले जात आहे. योग-प्राणायामद्वारे स्वत:ला वेळ दिल्यास जीवनात आनंद व उत्साह निर्माण होऊन निरोगी जीवन जगता येणार आहे. मन शांत नसल्यास चिडचिड होऊन कामात एकाग्रता निर्माण होत नाही. त्यामुळे अनेक कामे व निर्णय चुकत असल्याचे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.