आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरांचे नामांतर ही फक्त सुरुवात:भारत हिंदू राष्ट्र घोषित होईल; भाजप आमदार टी. राजा सिंह यांचा दावा, म्हणाले - हैदराबादचे नाव बदलणार

अहमदनगर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

2026 पर्यंत भारत अखंड हिंदू राष्ट्र म्हणून घोषित केला जाईल, असा दावा भाजपचे निलंबित नेते आणि आमदार टी. राजा सिंह यांनी केला आहे. ते अहमदनगर जिल्ह्यातल्या राहाता येथे हिंदुत्ववादी संघटनांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.

अहमदनगरचे नाव अहिल्यबाईनगर आणि तेलंगणाची राजधानी हैदराबादचे नाव भाग्यनगर करण्यात येईल, असा दावाही राजा सिंह यांनी केला.

साधू-संतांची भविष्यवाणी

राजा सिंह पुढे म्हणाले की, जगात 50 हून अधिक इस्लामिक देश आणि 150 हून अधिक ख्रिश्चन राष्ट्रे आहेत.तशी हिंदू बहुसंख्याक असणाऱ्या देशाला अखंड हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे त्यात अशक्य असे काय आहे, असा सवालही त्यांनी केला. 2025 आणि 2026 मध्ये भारताची अखंड हिंदू राष्ट्र म्हणून घोषणा होईल. हे मी म्हणत नाही, तर सर्व साधू-संतांची गर्जना आणि ही त्यांची भविष्यवाणी असल्याचे ते म्हणाले.

काही लोकांना दुःख

राजा सिंह म्हणाले, केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे धाराशिव असे नामांतर करण्यास नुकतीच मान्यता दिली. ही फक्त सुरुवात आहे. मात्र, या नामांतरामुळे काही लोकांना दुःख झाले. मी या लोकांना सांगू इच्छितो की, ही फक्त सुरुवात आहे. कारण अहमदनगरचेही नामांतर होईल. त्याचे नामांतर अहिल्याबाईनगर करण्यात येईल. हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर केले जाईल, असा दावाही त्यांनी केला.

आता हिंदूंचा उदय

राजा सिंह पुढे म्हणाले की, औरंगाबादच्या नामांतराला विरोध करणारे 'एमआयएम' खासदार इम्तियाज जलील यांच्यावर राजा सिंह यांनी टीका केली. ते म्हणाले, काही लोक त्यांचा जन्म औरंगाबादमध्ये झाला. औरंगाबादमध्येच मरू म्हणतात. मात्र, मी त्यांना सांगू इच्छितो की, तुमचा जन्म औरंगाबादेत झाला असला, तरी तुम्हाला संभाजीनगरमध्येच मरावे लागेल. हिंदू राष्ट्रातच मरावे लागेल. काहीही होवो. आता हिंदूंचा उदय झाला आहे. त्यामुळे कुठलेही नवीन नाव बदलले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...