आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोबाइलचा वापर फक्त सेल्फीसाठी न करता त्या माध्यमातून जीवसृष्टीचे जास्तीत जास्त व चांगले चित्रण करावे, आपल्यात इतरांपेक्षा काहीतरी वेगळेपण असणे आवश्यक असते असे असेल तरच आपली वेगळी ओळख निर्माण होते, असे प्रतिपादन पाथर्डीच्या आनंद महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. भाऊसाहेब घोरपडे यांनी केले.
पाथर्डी तालुक्यातील आदिनाथ नगर मधील दादापाटील राजळे आर्टस्,कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग व सायन्स असोशिएशन ने गेल्या वर्षी वाइल्डलाइफ डे व वर्ल्ड स्पॅरो डे निमित्त आयोजित ‘वाईल्ड लाईफ फोटोग्राफी स्पर्धा २०२१ ‘ या राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेचे पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी दादापाटील राजळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर हे अध्यक्षस्थानी होते.
या स्पर्धेत प्राणी या गटात प्रथम क्रमांक मिळवलेले नगरचे वन्यजीव अभ्यासक व छायाचित्रकार मंदार साबळे, नितीन केदारी (द्वितीय), इशा लांडे (तृतीय), पक्षी या गटामध्ये अंबेजोगाई चे मुन्ना सोमानी (प्रथम), पाथर्डी चे अतिश भावसार (द्वितीय) अहमदनगर चे सुधींद्र सोनावणे (तृतीय), कीटक या गटात रायगड चे गंगाराम लेंडवे (प्रथम),नाशिक चे तुषार उंडेगावकर (द्वितीय) ,शेवगाव च्या प्रियंका गवळी (तृतीय),निसर्ग गटात नांदेड येथील डॉ. अनिल साखरे (प्रथम) ,अहमदनगरचे ओंकार टारकसे (द्वितीय),आदिनाथनगर च्या प्रियंका उनवणे (तृतीय) , वनस्पती या गटात अमरावतीच्या प्रिया जाधव (प्रथम),आदिनाथनगर च्या भाग्यश्री वांढेकर (द्वितीय), औरंगाबादच्या प्रतीक्षा तायडे (तृतीय) या विजेत्यांपैकी उपस्थितांना पारितोषिके देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना साबळे यांनी विद्यार्थ्यांना निसर्गाचा व प्राणिशास्त्र विभागाचा खूप जवळचा संबंध आहे. अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर जीवसृष्टी नामशेष होत आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना जीवसृष्टीची उत्कृष्ठ छायचित्रे काढून या छायाचित्रांच्या माध्यमातून ही जीवसृष्टी जतन करून ठेवावी, असे आवाहन केले. काळाला थांबवण्याचे सामर्थ्य हे या कलेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.