आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:नागरिकांची लूट करणाऱ्या सेतू चालकांवर कारवाई करा : आमदार प्राजक्त तनपुरे

राहुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय, तसेच इतर विविध दाखल्यांसाठी जास्त पैसे आकारून नागरिकांची लूट करण्याच्या तक्रारी आल्यास संबंधित महा-ई-सेवा सेतू केंद्रचालकांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना आमदार प्राजक्त तनपुरे यांनी तहसीलदार फसिओद्दीन शेख यांना केली. महा-ई सेवा सेतुच्य नावाखाली आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी आमदार तनपुरे यांच्याकडे केल्या होत्या. त्यानुसार तनपुरे यांनी नुकतीच येथील सेतू कार्यालयाला अचानक भेट देऊन माहिती घेतली. विविध दाखल्यांसाठी लागणारे शासकीय शुल्क व कालावधीचा फलक दर्शनी भागावर लावावा अशा सूचना तनपुरे यांनी केल्या.

बातम्या आणखी आहेत...