आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:अवैध धंद्यावर कारवाई करा, अन्यथा राजूर पोलिस ठाण्यासमाेर आंदोलन

अकोलेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अकोल्यातील अवैध धंद्यावर व विशेषकरून अवैध दारू विक्रेत्याबाबत तक्रारी करूनही पोलिसांकडून कारवाई करण्यात येत नाही. आपण संगमनेर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी व अकोले व राजूर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत केलेल्या मागण्यांवर कारवाई करण्याबाबतचे योग्य आदेश द्यावेत. अन्यथा पुढील आठवड्यापासून आम्ही दारुबंदी आंदोलक राजूर पोलिस ठाण्यासमोरच उपोषण व आंदोलन करणार आहोत, असा इशारा दारूबंदी आंदोलनाचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी पाेलिस अधीक्षक म्हणून राकेश ओला यांना लेखी पत्र वजा तक्रार दाखल करून दिला.

हेरंब कुलकर्णी यांनी पत्रात नमूद केले आहे की, अकोल्यातील अवैध दारू बंदी व्हावी म्हणून १५ ऑगस्टला दारुबंदी आंदोलकांनी आंदोलन केले. पण अजूनही संगमनेर तालुक्यातील येथे येणारी ही अवैध दारू थांबत नाही. अकोल्यातील शाहूनगरमध्ये दारूने २३ मृत्यू १० वर्षात घेतले. तेथे आंदोलन करूनही पुन्हा दोन महिलांनी अवैध दारू विक्री सुरू केली. राजूर गावातून दारूबंदी असूनही दारू विकली जात आहे.

यासंदर्भात ३० सप्टेंबर रोजी अकोले येथे पोलिस स्टेशनला बैठक होऊन सुद्धा काहीही फरक झाला नाही. आपले संगमनेर येथील उपविभागीय पोलिस उपाधीक्षक राहुल मदने यांना ४ वेळा फोन व अनेक मेसेज करूनसुद्धा त्यांनी काहीही केले नाही. वास्तविक १५ ऑगस्टच्या आंदोलनात त्यांनी दारू बंद करण्याचा शब्द दिला, पण त्यांचेच मुख्यालय असलेल्या संगमनेरहून २२ किलोमीटरवर अकोल्यात दारू येते व ते काहीच करू शकत नाहीत? तेव्हा आपण राजूर व शाहूनगर येथे भेट देऊन तिथली वस्तुस्थिती बघावी, अशी विनंती करून कुलकर्णी यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...