आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण:शर्मा, जिंदाल यांना बेड्या ठोका म्हणत नगरमध्ये मुस्लिम बांधवांचे आंदोलन

अहमदनगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दलच्या केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा, नवीन जिंदाल यांना बेड्या ठोका, अशी मागणी करत मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी शहरबबंद आंदोलन केले. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असून, सर्जेपुरा, कोठला भागातील बहुतांशी दुकाने शुक्रवारी बंद राहिली.

पुतळ्याला जोडे मारले

भाजप वक्त्या नुपूर शर्मा यांनी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी अहमदनगर शहरातील कोठला भागात शर्मा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आले. शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शर्मा यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी आंदोलनकरांनी केली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कापड बाजार ,सर्जेपुरा, कोठला या भागातील दुकाने बंद होती.

आंदोलकांना घेतले ताब्यात

शर्मा यांच्याविरोधात कोठला येथे आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या आंदोलनामुळे अहमदनगर -औरंगाबाद रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. त्याचबरोबर शहरातील कापड बाजार सर्जेपुरा व अन्य परिसरात पोलिस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...