आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा काही जिहादी लोकांकडून जाणीवपूर्वक हिंदू समाजाला लक्ष्य करून वारंवार हल्ले होत आहेत. या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करुन ठोस पावले उचलावीत, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्या मुंबई-गोवा व बजरंग दलाचे क्षेत्रीय संयोजक विवेक कुलकर्णी यांनी केली. कुणाल भंडारी यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला.
त्यानंतर पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. कुणाल भंडारी यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते दिल्ली गेटपर्यंत मोर्चा काढण्यात आला. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, निरीक्षक संपत शिंदे, उपअधीक्षक अनिल कातकडे यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी प्रांत धर्म प्रसार सर्वप्रमुख मिलिंद मोभारकर, बजरंग दलाचे प्रांत सहसंयोजक नितीन महाजन, प्रांत सेवा सहप्रमुख डॉ. प्रदीप उगले, अध्यक्ष जय भोसले, शहराध्यक्ष विजयकुमार पादिर, विभाग मंत्री सुनील ख्रिस्ती, सुधीर लांडगे, मोहन नातू, जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे, जिल्हा सहमंत्री मुकुल गंधे, गौतम कराळे, हरिभाऊ डोळसे, डॉ. एकनाथ मुंडे, संजय बंडी, बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष भारत थोरात, बाली जोशी, श्रीरामपूर जिल्हा सहमंत्री गोपाळ राठी, विशाल वाकचौरे, वसंत लोढा, अभिषेक कळमकर, सुवेंद्र गांधी, विक्रम राठोड, भगवान फुलसौंदर, दिलीप सातपुते, भैया परदेशी, प्रकाश भागानगरे, विपुल शेटीया, गजेंद्र दांगट, संजय आडोळे, राजाभाऊ मुळे, रा. स्व. संघाचे वाल्मीक कुलकर्णी, हिराकांत रामदासी, देविदास मुदगल, बापू ठाणगे, राजेश्वर भुकन, बाली जोशी, अनिल राऊत, राजेंद्र चुंबळकर, दिगंबर राळेभात आदी उपस्थित होते.
समाज कंटकाकडून जाणीवपूर्वक हिंदू समाजावर वारंवार सशस्त्र हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षी रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. मकरसंक्रांतीच्या दिवशी नगर शहरात कोठला व जे. जे. गल्ली या भागात सशस्त्र हल्ले करण्यात आले. नुकत्याच झालेल्या शिवजयंती मिरवणुकीत सामील झाल्यावरून दहीगावने येथे अमोल दीपक जरे या शिवभक्तास मारहाण करण्यात आली. वक्फ बोर्ड या संस्थेचे नोंदणीकरण व शासन मान्यता रद्द करावी. हिंदू धर्म स्थळावरचे अतिक्रमण हिंदू समाज सहन करणार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.