आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:पाण्याचे प्रवाह बंद करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करा ; मंत्री विखे

शिर्डीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अतिक्रमणामुळे बंदिस्त झालेल्या चरांचे, नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह पुर्ववत करण्याच्या सुचना महसुल, पशुसंवर्धन व दूग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. अतिवृष्टीमुळे जलमय झालेल्या भागाची पाहाणी करुन त्‍यांनी शेतकर्यांशी संवाद साधला. विविध गावांमध‍ये समोर आलेल्या तक्रारींवरुन अतिक्रमण करुन पाण्याचे प्रवाह बंद करणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

राहाता तालुक्यातील गावांमध्ये दोन दिवसांपुर्वी मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीत शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये स्थानिक रहिवाशांच्या घरामध्ये पाणी गेल्यामुळे नागरिकांनाही त्रास सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर महसुल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी अधिकाऱ्यांसमवेत सर्वाधिक जलमय झालेल्या पाथरे, हनुमंतगाव या गावांचा पाहाणी दौरा केला. या दौऱ्यामध्ये स्थानिक नागरिकांचे प्रश्नही त्यांनी जाणून घेतले.

प्रामुख्याने चरांचे, नाल्यांचे नैसर्गिक स्त्रोत बंदिस्त झाल्यामुळेच मोठ्या प्रमाणात पाणी शेतांमध्ये साठले. यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाण्यामुळे पिकही सडून गेल्याने हाती आलेले पिक वाया गेल्याचेच चित्र सर्वत्र निर्माण झाले आहे. या परिस्थितीत मार्ग काढण्‍यासाठी महसुल मंत्री विखे यांनी सर्वच गावांमध्ये ओढ्या नाल्यांमध्ये झालेली अतिक्रमण तातडीने काढून टाकून पाण्याचे प्रवाह पुर्ववत होण्यासाठी नळ्या टाकण्याची व्यवस्था करण्याच्‍या सुचना त‍यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आधिकाऱ्यांना दिल्या.

महसुल प्रशासनाने यासर्व ओढ्या नाल्यांची एकदा पाहाणी करुन, त्याची हद्द निश्चित करावी. कोणाचेही अतिक्रमण असले तरी, त्याला पाठीशी घालू नका अशा स्पष्ट सुचना त्यांनी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना दिल्या आहेत. अनेक रहिवाश्यांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे नुकसान झालेल्या परिस्थितीचीही पाहाणी विखे यांनी केली. तात्पुरती मदत म्हणून या ग्रामस्थांना किराणा सामान देण्यात आले. यावेळी तहसिलदार कुंदन हिरे, आदी अधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...