आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोंधळ:महसूलच्या अनागोंदी कारभाराचा फायदा घेत रस्त्याच्या जागेवर ताबा ; एकाच जागेच्या दोन उताऱ्यांची नोंद, लँड माफियांविरोधात नागरिकांचे आंदोलन सुरूचमारण्याचा घाट

नगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोल्हेगाव येथील रहिवाशांच्या घर व दुकानांसमोर असलेल्या रस्त्याची जागा हडपण्याचा प्रयत्न स्थानिक लँड माफियांकडून सुरू आहे. याबाबत नागरिकांचे सोमवारी दुपारपासून महापालिकेत ठिय्या आंदोलन सुरू आहे. मात्र, प्रशासनाकडून योग्य दखल घेतली नसल्याचा आरोप करत २६ नागरिकांनी दोन दिवसांपासून आयुक्तांच्याच दालनात मुक्काम ठोकला आहे. दुसरीकडे एकाच जागेच्या दोन उताऱ्यांची नोंद असल्याचे समोर आले असून, महसूल प्रशासनाच्या या अनागोंदी कारभाराचा फायदा घेत जागा हडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

सोमवारी दुपारी मनपा आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर आंदोलक नागरिकांनी आयुक्तांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. १९९६ साली लेआऊट मंजूर असताना व त्यात रस्ता दाखवलेला असताना खुद्द आयुक्त चर्चेवेळी तेथे रस्ता नसल्याचा दावा कसा करू शकतात? मनपा प्रशासन पूर्णपणे लँड माफियांचा दबावाखाली असल्याचे यातून दिसून येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

यासंदर्भात न्याय मिळेपर्यंत येथून हटणार नाही, अशी भूमिकाही आंदोलकांनी घेतली आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत आंदोलक मनपा आयुक्तांच्या दालनात तळ ठोकून होते. मात्र मनपाचा एकही अधिकारी सायंकाळपर्यंत या ठिकाणी फिरकला नव्हता, असे आंदोलकांकडून सांगण्यात आले. दरम्यान, १९९६ साकी एनए ऑर्डर झाल्यानंतर लेआऊट मंजूर झालेला आहे. त्यात रस्ता दर्शविण्यात आलेला आहे. तो रस्ता दाखवूनच तेथील प्लॉट विकण्यात आले आहेत. या सर्वांची नोंद उताऱ्यावर आहे. मात्र, जागा एनए होण्यापूर्वी असलेला शेत जमीन जागेचा उतारा अद्याप बंद करण्यात आलेला नाही.

त्यामुळे एकाच जागेचे दोन उतारे दिसून येत आहेत व याचाच फायदा घेत जागा हडपण्याचा प्रयत्न होत आहे. याच जुन्या उताऱ्याचा आधार घेऊन एनए झालेली जागा पुन्हा एनए करून हडपण्यासाठी अर्जही करण्यात आला होता. मात्र, कल्याण माफियांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला, असेही आंदोलकांनी निदर्शनास आणले आहे.

बातम्या आणखी आहेत...