आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोहिनी मायच्या जयघोषात भगवान विष्णूचे मोहिनी अवताराचे एकमेव स्थान असलेल्या ग्रामदैवत श्री मोहिनीराज यात्रा उत्सवानिमित्त आई जगदंबेच्या नावाचा जयघोष करत रविवारी पौर्णिमेच्या रात्री लखलखत्या अग्निचे खापराचे भांडे तळहातावर घेऊन पारंपरिक उत्साहात भळंद कार्यक्रम पार पडला. रथ सप्तमी पासून सुरु झालेल्या ग्रामदैवत श्री मोहिनीराज यात्रेमुळे शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण आहे.
माघ शुध्द पोर्णिमेस गावातील सर्व कुटुंबातून कुलधर्म कुलाचार केला जातो या वेळी देवाला पूृरणपोळीचा नैवेद्यही दाखवला जातो. पौर्णिमेचे आकर्षण म्हणजे माघ पोर्णिमेच्या रात्री मंदिरा समोरील मंडपात गोंधळ घालत भळंद खेळत देवतेला यात्रा उत्सवासाठी आमंत्रण दिलं जातं. देवीचा जागर करीत श्रीरामपुर तालुक्यातील वडाळा महादेव येथील रेवणनाथ महाराज जोशी, आदिनाथ जोशी व अदिती जोशी यांनी लखलखत्या अग्नीचे खापराचे भांडे तळहातावर घेऊन पारंपरिक उत्साहात भळंद कार्यक्रमाद्वारे देवदेवतांना मोहिनीराजांच्या यात्रेचे निमंत्रण दिले.
सोमवारी पहाटे ग्रामदैवत श्री मोहिनीराजांचा महाभिषेक होऊन तहसीलदारांच्या रुपेशकुमार सुराणा यांच्या हस्ते मानाची पूजा पार पडली. यात्रेनिमित्त मंदिरावर झेंडे चढवायची परंपरा आहे. सोमवारी पहिल्या दिवशी कुटे कुटुंबीयांना झेंड्याचा पहिला मान होता. नेवासे बुद्रुकचे ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिकांसह कुटे कुटुंबियों मानाचा झेंडा मंदिरावर चढवला. दुपारी एक वाजता मोहिनी राजाची उत्सव मूर्ती पालखीतून वाजत गाजत पाक शाळेत पाच दिवसाच्या मुक्कामाला आली. मंदिरातून देव बाहेर पडताना मानकरांच्या हस्ते मूर्तीची पूजा करण्यात आली.
माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते मूर्तीला नववस्त्र परिधान करून पालखीत ठेवलेल्या उत्सव मूर्तीचे त्यांनी पूजा करून दर्शन घेतले विश्वस्तांच्या वतीने शंकरराव गडाख यांचा सत्कार करण्यात आला. आज मंदिरातून निघालेली पालखी जुन्या कोर्ट गल्ली मार्गे पाकशाळेमध्ये गेली. यावेळी गावातील भजनी मंडळ व कै. सौ.बदामबाई गांधी विद्यालयाच्या मुलींच्या लेझीम पथकाने मिरवणुकीत सहभाग घेतला. सायंकाळी सहा वाजता गुगळे कुटुंबीयांतर्फे मानाची पंगत देण्यात आली. संपूर्ण गावकऱ्यांनी पंगतीत प्रसादासाठी हजेरी लावली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.